खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आता अडवणुकीची भूमिका घेतली असून पोलीसांना वॉरंट देण्याची मागणी केली. पाचशे शिवसैनिक आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले, तरी देखील आमच्यावर गुन्हा दाखल केला जातोय. आम्ही तुम्हाला सहकार्य केले. आम्ही एकही पाऊल बाहेर ठेवले नाही, संजय राऊतांच्या वक्तव्यावर गुन्हा दाखल होत नाही. गुंडांवना बाहेर पाठविलेय त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशा शब्दांत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी वॉरंट दिल्याशिवाय आम्ही तुमच्यासोबत येणार नसल्याची भुमिका घेतली आहे.
मातोश्रीबाहेर किती शिवसैनिक जमले? राणे म्हणाले, मी मोजायला सांगितले; थेट आकडेच दिले
संजय राऊतांनी यापुढे कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात, असे नागपुरात म्हणाले होते. वीस फूट खाली गाडले जाल, असा इशारा त्यांनी दिला होता. यावर नवनीत राणा संतापल्या. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही अशा आमच्या घरात येऊ शकत नाही, चला बाहेर, अशा शब्दांत राणा यांनी पोलिसांना सुनावले.
पोलीस आम्हाला येऊन सांगत आहेत की आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आम्हाला गाडण्याचे म्हणणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा तसेच अनिल परबांवर गुन्हा दाखल करावा. आम्हाला वॉरंट दाखविल्याशिवाय आम्ही बाहेर येणार नाही, असे रवी राणा म्हणाले.
तर बाहेर शिवसैनिकांना युवा सेनेचे नेते सरदेसाई यांनी राणा यांना विमानतळावर नाही तर पोलीस चौकीत नेणार असल्याचे सांगत शिवसैनिकांनी त्यांना जाऊ द्यावे, असे आदेश आले असल्याचे सांगितले.