शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
2
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
3
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
4
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
5
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
6
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
7
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
8
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
9
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
10
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
11
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
12
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
13
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
14
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
15
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
16
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
17
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
18
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
19
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
20
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

...तेव्हा शिवसेनेचीच रुग्णवाहिका होती-अमिताभ

By admin | Published: June 20, 2016 5:17 AM

कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाल्यानंतर मला विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. तेंव्हा मला विमानतळावरुन रुग्णालयात नेण्यासाठी केवळ शिवसेनेचीच रुग्णवाहिका उभी होती

मुंबई : कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाल्यानंतर मला विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. तेंव्हा मला विमानतळावरुन रुग्णालयात नेण्यासाठी केवळ शिवसेनेचीच रुग्णवाहिका उभी होती, अशी आठवण अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सांगितली. शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदींनी शिवसेनेला शुभेच्छा देत जागवलेल्या आठवणींची चित्रफीत दाखविण्यात आली. मी आणि जया जेंव्हा पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो तेंव्हा मार्इंनी जयाचे आपल्या सूनेसारखेच स्वागत केले होते. हा कौटुंबिक स्रेह तसाच आहे, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र असल्याचे सांगत शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारणात मी सहभागी आहे, असे लता मंगेशकर म्हणाल्या. (प्रतिनिधी)आम्ही आमचे बघून घेवू - उद्धव ठाकरेदेशात दरवर्षी कुठे ना कुठे निवडणुका असतात. या निवडणुका आता एकत्र घेण्याचा विचार करायला हवा. कारण, सततच्या निवडणुकांमुळे काहीजणांना आपले परदेश दौरे थांबवून भारतात यावे लागते. प्रचारसभा घ्यावा लागतात, असा चिमटाही उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता काढला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री अशा घटनात्मक पदावरील व्यक्तींनी प्रचारात उतरायला नको. विधानसभा निवडणुकी दरम्यान मोदींनी महाराष्ट्रात तब्बल २७ सभा घेतल्या. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसाठी सारी यंत्रणा राबते. लोकांचाही घटनात्मक पदावरील व्यक्तीचे ऐकण्याकडे कल असतो. त्यामुळे त्यांनी सभा घेवू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नालायकांबरोबर सत्तेत राहू नका, असा सल्ला अलीकडेच शरद पवार यांनी दिला. पण आम्ही आमचे बघून घेवू, तुमच्या सल्लयांची गरज नाही. आजपर्यंत मी कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली नाही. तुम्हीतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला लकवा मारल्याचे विधान केले होते, याची आठवण उद्धव यांनी करून दिली.