मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यास जिल्हा परिषदेच्या शाळातील 8वी ते 1क्वी च्या विद्याथ्र्याना मोफत टॅबचे वाटप करणार असून जि.प. शाळांमध्ये टी.व्ही. संचावरून पहिली ते दहावीर्पयतचे शिक्षण देण्याच्या ‘ई-प्रबोधन कार्यक्रमाचे सादरीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.
ठाकरे म्हणाले की, 8वी ते 1क्वीचा अभ्यासक्रम असलेली एसडी कार्ड टॅबमध्ये घालून ती विद्याथ्र्याना देण्यात येतील. हीच कार्ड विद्यार्थी आपल्या स्मार्ट फोनमध्ये घालून मोबाईलवरही अभ्यास करु शकतील. ग्रामीण भागात वीजेचे भारनियमन केले जात असल्याने टॅब बरोबर सोलार चाजर्र देण्यात येईल.
याखेरीज ज्या जिल्हा परिषद अथवा नगरपालिकांच्या शाळात टी.व्ही. संच नाहीत त्यांना ते देण्यात येतील. त्यासोबत पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम असलेले पेन
ड्राईव्ह देण्यात येतील. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थीचे शिक्षण अखंड सुरु राहील. निवडणूक असल्यावर राजकीय पक्ष लोकांना टी.व्ही. फ्रीज देण्याची आश्वासने देतात.
मात्र शिवसेना शिक्षणाच्या माध्यमातून या वस्तू खरेदी करण्याची ताकद देणार आहे. सध्या मराठी व इंग्रजी भाषेत ई-प्रबोधन योजनेचे हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. सत्ता आल्यावर विविध भारतीय भाषांमध्ये हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मोदींवरच्या प्रश्नावर टोलवाटोलवी
नरेंद्र मोदी यांचे भाषण देशातील विद्याथ्र्याना दाखवण्याची सक्ती करण्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता हा सक्तीचा विषय नसून ज्यांच्यार्पयत हे भाषण पोहोचवायचे आहे त्यांच्यार्पयत ते पोहोचणो गरजेचे आहे. याबाबत आपल्याला तपशीलात माहिती नाही, असे सांगत त्यांनी हा विषय टोलविला.