मुंबई : राज्यात उग्र आंदोलन झाले की, पहिला दगड बसतो तो एसटीवर. सर्वसामान्यांच्या असणाऱ्या एसटीला आंदोलनकर्त्यांकडून वेठीस धरण्यात येत असल्याने, एसटीला मोठा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. २0१२ पासून राज्यात झालेल्या विविध मोठ्या आंदोलनात एसटी सेवा होरपळली आहे. बसची तोडफोड आणि जाळपोळ केल्याने, महामंडळाला आतापर्यंत ४ कोटी ४२ लाखांचा फटका बसला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील, नुकत्याच घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटले. यात आंदोलनकर्त्यांनी एसटी बसेसनाच लक्ष्य केले. सात बस जाळण्यात आलेल्या असतानाच, तब्बल १९ बसेसची तोडफोड केली. त्यामुळे महामंडळाला ३ कोटी ५0 लाखांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा नुकसानीचा आकडा असल्याचे सांगितले जाते. २0१२ पासून होणाऱ्या आंदोलनात एसटीला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. नोव्हेंबर २0१२ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या आंदोलनात, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथील एसटी बसेसना लक्ष्य करण्यात आले. यात ७४ लाख ८४ हजार २५४ रुपये एसटीला नुकसान सोसावे लागले. त्यानंतर, २0१३ मध्ये दोन मोठी आंदोलने झाली. यामध्ये मनसे विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या आंदोलनात, अहमदनगर भागात एसटीची तोडफोड करण्यात आली. या आंदोलनात १३ लाख ११ हजार रुपयांचा फटका बसला. यानंतर, नोव्हेंबरमध्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा, कोल्हापूर, सांगली येथे पुकारलेल्या आंदोलनात, पुन्हा एसटीला लक्ष्य करण्यात आले आणि १ लाख ४७ हजार रुपयांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)२0१४मध्ये सलग तीन आंदोलने धनगर समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात सातारा व सोलापूरयेथे एसटीची तोडफोड केली गेली. यात एसटीला १ लाख ६१ हजारांचे नुकसान सोसावे लागले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, सोशल मीडियातून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनात एसटीचे ४४ हजार ५00 रुपयांचा फटका बसला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतही सोशल मीडियातून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आणि कोल्हापूरमध्ये झालेल्या आंदोलनात, ४१ हजार ८00 रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. ।आंदोलनात एसटीचे नुकसान केल्यास, त्या भागात दहा टक्के भाडेवाढ करण्याचा विचार काही दिवसांपूर्वी परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मांडला होता. या संदर्भात रावते यांना विचारले असता, याबाबत काहीही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. मात्र, लोकांचा संताप असतो, तो एसटी बसवर निघतो, पण हा संताप एसटीवर काढणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
शिवसैनिकांचा ‘मनसे’ झटका
By admin | Published: October 19, 2016 6:01 AM