शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
3
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
4
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
5
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
6
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
7
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
8
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
9
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
10
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
11
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
12
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
13
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
15
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
16
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
17
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
18
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
19
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
20
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची ‘जमवाजमव’!

By admin | Published: September 29, 2015 2:00 AM

‘एक व्यक्ती, एक मैदान’ म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवाजी पार्क असे हे दसरा मेळाव्याचे दृढ समीकरण होते.

मुंबई : ‘एक व्यक्ती, एक मैदान’ म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवाजी पार्क असे हे दसरा मेळाव्याचे दृढ समीकरण होते. लोक उत्स्फूर्तपणे या मेळाव्यास हजेरी लावत असत. मात्र यंदा दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमवण्याचे नियोजन करण्याकरिता चक्क सोमवारी शिवसेना भवनात बैठक घ्यावी लागली. कोल्हापूर व कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक आणि शिवसेनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, हे औचित्य साधून यंदाच्या दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी जून महिन्यात षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमावर मुसळधार पावसाने पाणी फेरले होते. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने गर्दी जमवण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी शिवसेना भवनात सोमवारी एका बैठकीचे आजोजन करण्यात आले होते.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन करावे, अशी योजना होती. मात्र अशा बैठकीस उद्धव यांनी उपस्थित राहाणे उचित दिसणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम व खासदार संजय राऊत यांनी सूचित केल्याने उद्धव यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार अनिल देसाई यांनी बैठकीत जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, अशी विचारणा पदाधिकाऱ्यांनी केली असता मेळाव्याचे ठिकाण ठरलेले नाही. मात्र सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मेळावा शिवाजी पार्कमध्येच व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)