शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शिवसेनेचा विरोध कायम

By admin | Published: August 29, 2014 3:01 AM

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यापाठोपाठ मुंबई महानगर प्रदेशाकरिता न्यूयॉर्क, शांघाय शहरांच्या धर्तीवर स्वायत्त व्यवस्था निर्माण करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या पचनी पडणार नाही

मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यापाठोपाठ मुंबई महानगर प्रदेशाकरिता न्यूयॉर्क, शांघाय शहरांच्या धर्तीवर स्वायत्त व्यवस्था निर्माण करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या पचनी पडणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या वर्तुळात एकेकाळी उठबस असलेल्या सुधींद्र कुलकर्णी यांनी याबाबतची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची तयारी दाखवली असून शिवसेनेने या कल्पनेला विरोध केला आहे.शिवसेनेने अलीकडेच भाजपाला विश्वासात न घेता आपले व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले. त्यामध्ये मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सुधींद्र कुलकर्णी यांनी एमएमआर क्षेत्राकरिता स्वतंत्र, स्वायत्त व्यवस्था निर्माण करण्याची कल्पना मांडली आहे.कुलकर्णी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात शहरांतील स्वच्छतागृहांच्या समस्येसह बकालीचा उल्लेख केला होता. मुंबई शहरासह एमएमआर क्षेत्रात सध्या राज्य शासन, एमएमआरडीए व महापालिका यांच्याकडून नागरी सुविधा पुरवल्या जातात. परस्पर समन्वयाअभावी एमएमआर क्षेत्रात अनेक समस्या तीव्र बनल्या आहेत. न्यूयॉर्क स्टेट व न्यूयॉर्क शहर यांचे प्रशासनअनुक्रमे गव्हर्नर व मेयर यांच्याकडून स्वतंत्रपणे चालवले जाते. चीनमध्ये चार मोठी शहरे प्रशासनाबाबत स्वायत्त आहेत. दिल्लीतील सरकार हे नॅशनल कॅपिटल रिजन म्हणून ओळखले जाते. दिल्ली सरकारच्या अखत्यारित उत्तर प्रदेश, हरियाणा व राजस्थानच्या काही भागाचा समावेश होतो. त्याच धर्तीवर एमएमआर क्षेत्राचा कारभार चालवला गेला पाहिजे. याकरिता ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची तयारी कुलकर्णी यांनी दर्शविली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा हा प्रयत्न नाही तसेच हे आपले वैयक्तिक मत असून भाजपाशी त्याचा संबंध नाही, असेही ते म्हणाले.शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मान्यतेने मेयर इन कौन्सिल पद्धती लागू केली होती. मात्र पुढे राज्य सरकार व महापालिका यांच्यात त्यामुळे संघर्ष होऊ लागला. एकाच राज्यात दोन सरकारने चालवणे फारसे यशस्वी होत नाही. केंद्र सरकारने मुंबईला अधिकाधिक आर्थिक मदत देणे हाच या शहराच्या समस्यांवरील उपाय आहे. शरद पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत मुंबईकरिता स्वतंत्र मंत्री नियुक्त केला होता. त्यामुळे यातून फार काही साध्य होणार नाही, असे राऊत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)