मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत लहान भावाची भूमिका घेऊन युतीत सामील झालेल्या शिवसेनेने आपला स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला आहे. युवासेना प्रमुख आणि वरळी मतदार संघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यात शिवसेने भाजपच्याही एक पाऊल पुढं टाकले आहे. हा वचननामा एकप्रकारे शिवसेनेचा भाजपला शह असल्याचं बोलले जात आहे.
शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्त आणि पीकविमा योजनेत बदल करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षाला दहा हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी दरमहा 10 हजार रुपये या आश्वासनातून सेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपला शह दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान योजना गेल्या वर्षी जाहीर केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळत आहे.
याच योजनेचा धागा पकडून शिवसेनेने रक्कम वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. अर्थात वर्षाला दहा हजार ही रक्कम मोठी आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना अधिकप्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे वचननाम्यातील घोषणेचा विचार केल्यास, शिवसेना भाजपच्या एक पाउल पुढे दिसत आहे. वचननाम्यात सेनेच्या वतीने आरोग्यसेवेवर देखील भर देण्यात आला आहे.
दरम्यान शिवसनेच्या वचननाम्या व्यतिरिक्त राज्यातील विभागवार समस्या लक्षात घेऊन विभागवार वचननामा करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. विभागवार वचननामा करण्याची कल्पना ही सेनेकडून प्रथमच समोर येत आहे.