शिवसेनेचे संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:22 PM2019-09-28T15:22:58+5:302019-09-28T17:46:04+5:30

युतीचे गुऱ्हाळ सुरू आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मॅरेथॉन बैठक घेत शिवसेनेसमोर 144-126 असा फॉर्म्युला ठेवला आहे.

Shiv Sena's Sanjay Raut meet Sharad Pawar at home | शिवसेनेचे संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

शिवसेनेचे संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Next

मुंबई :  शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या कारवाईचे पडसाद राज्यभरात सगळीकडे उमटू लागले होते. यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही शरद पवार यांना पाठिंबा देत या कृत्याचा निषेध नोंदविला होता. आज शिवसेनेचे नेते संजय राऊत शरद पवार यांच्या घरी गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


 युतीचे गुऱ्हाळ सुरू आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मॅरेथॉन बैठक घेत शिवसेनेसमोर 144-126 असा फॉर्म्युला ठेवला आहे. तसेच काही जागांची अदलाबदलही ठेवली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत युती होणार की तुटणार यावर निर्णय यायचा आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने शरद पवारांना पाठिंबा दिल्याने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगळी आघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


आज शरद पवारांच्या मुंबईतील घरी सिल्व्हर ओकवर अजित पवार यांच्याशी शरद पवार यांची बैठक झाली. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. अजित पवार यांच्यासोबतची बैठक संपली असून ते आता पत्रकार परिषद घेणार आहेत. तर अजित पवार तिथून निघाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. 


शिवसेनेचा पाठिंबा
शरद पवार फक्त महाराष्ट्रातील देशातील महत्वाचे नेते. ज्या प्रकरणात शरद पवारांचे नाव नाही तरीही गुन्हा दाखल होत असेल तर त्याबाबत लोकांच्या मनात शंका उपस्थित होणं स्वाभाविकच आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. 
 

Web Title: Shiv Sena's Sanjay Raut meet Sharad Pawar at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.