मुंबई : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या कारवाईचे पडसाद राज्यभरात सगळीकडे उमटू लागले होते. यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही शरद पवार यांना पाठिंबा देत या कृत्याचा निषेध नोंदविला होता. आज शिवसेनेचे नेते संजय राऊत शरद पवार यांच्या घरी गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.
युतीचे गुऱ्हाळ सुरू आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मॅरेथॉन बैठक घेत शिवसेनेसमोर 144-126 असा फॉर्म्युला ठेवला आहे. तसेच काही जागांची अदलाबदलही ठेवली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत युती होणार की तुटणार यावर निर्णय यायचा आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने शरद पवारांना पाठिंबा दिल्याने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगळी आघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेचा पाठिंबाशरद पवार फक्त महाराष्ट्रातील देशातील महत्वाचे नेते. ज्या प्रकरणात शरद पवारांचे नाव नाही तरीही गुन्हा दाखल होत असेल तर त्याबाबत लोकांच्या मनात शंका उपस्थित होणं स्वाभाविकच आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.