ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ७ : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना नेत्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेचा एकही नेता वर्षा बंगल्याकडे फिरकला नाही. शिवसेना आणि भाजपामधील वाढता दुरवा यातुन दिसून येत होता. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचं नाव निच्छित झालं आहे. शिवसेनेला राज्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागणार आहे. भाजपाकडून सेनेला कोणतेही कॅबेनेट पद दिले नसल्याचे सुत्राकडून समजले आहे. त्यामुळं शिवसेनेला केंद्रात उपेक्षा सहन करावी लागल्यानंतर राज्यातही ठेंगा मिळल्याचं चिन्हं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या बहुतप्रतिक्षित विस्तारात एकूण ९ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपाचे ४ , शिवसेनेचे २ आणि मित्रपक्षाच्या २ जणांचा समावेश आहे.