मुंबई- अंधेरी पोटनिवडणुकीवरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपला पत्र लिहीले होते. या पत्रानंतर आज लगेच भाजपने अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मागण्या केल्या आहेत.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा विरोध शमला, अपक्षांचे काय? शिवसेनेने दिली प्रतिक्रिया
"राज ठाकरे यांच्या पत्राचा भाजपवर परिणाम होत असेल तर तुम्ही भाजपला आणखी एक पत्र लिहा. राज्यपाल भागतसिंह काश्यारीजी वारंवार महाराष्ट्राचा अवमान करत असतील तर असे राज्यपाल केंद्राने परत बोलावले पाहिजेत, आणि राज्यातील वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात परत येण्यासाठी पत्र लिहा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा विरोध शमला, अपक्षांचे काय?
अंधेरी पोटनिवडणुकीवरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ही प्रतिक्रिया आमदार अनिल परब यांनी दिली आहे.
"निवडणूक बिनविरोध करण्याची ही परंपरा आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल परंपरा पत्रकार परिषद घेऊन सांगितली.अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात भाजपने अर्ज मागे घेतला आहे.या बद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो" तसेच अजुनही काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज आहेत, त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिली.