शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

शिवाजी गोविंदराव सावंत स्मृतिदिन

By admin | Published: September 18, 2016 10:01 AM

शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंडमानली जाते.

प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १८ : शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंडमानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.
 
व्यक्तिगत जीवन आणि कारकीर्द
शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी  कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतीलपदविका घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.
 
पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्णलक्ष केंद्रित केले.
 
शिवाजी सावंत हे इ.स. १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या "बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे" ते संमेलनाध्यक्ष होते. मृत्युंजय १९६७), या पौराणिक कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंतयांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह‘ दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.
 
मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांनी थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि  शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.
 
‘मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिकविषयावरची कादंबरी लिहिली. शिवाजी सावंत यांची कादंबर्‍यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेतअनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे. मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्या असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेतकसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीयज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
कर्‍हाड येथे भरणार्‍या ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
 
प्रकाशित साहित्य
अशी मने असे नमुने (व्यक्तिचित्रे -१९७५)
कवडसे (ललित निबंध)
कांचनकण (ललित निबंध)
छावा (छत्रपती संभाजीच्या जीवनावरील कादंबरी -१९७९)
छावा (नाट्यरूपांतर)
पुरुषोत्तमनामा
मृत्युंजय -(महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी -१९६७)
मृत्युंजय (नाट्यरूपांतर)
मोरावळा (व्यक्तिचित्रे -१९९८)
युगंधर (भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी -२०००)
युगंधर श्रीकृष्ण : एक चिंतन
लढत (सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र, दोन भागांत-१९८६)
शेलका साज (ललित निबंध-१९९४)
संघर्ष (कामगार नेते मनोहर कोतवाल यांचे चरित्र -१९९५)
 
सावंत यांना मिळालेले सन्मान/पुरस्कार
मृत्यंजयसाठी -
महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७)
न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२)
ललित मासिकाचा पुरस्कार (१९७३)
भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९४)
फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६)
आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८)
पूनमचंद भुतोडिया बंगाली पुरस्कार (ताम्रपटासह, कलकत्ता-१९८६)
 
’मृत्युंजय’च्या प्रतिमा दवे यांनी केलेल्या गुजराती भाषांतराला, गुजरात सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार (१९९०)
त्याच गुजराती भाषांतराला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार(१९९३)
 
छावासाठी -
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९८०)
बडोदे मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९८३)
पुणे महापालिकेतर्फे सन्मानपत्र (१९९७)
 
कोल्हापूर येथे १९९८ मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (१० फेब्रुवारी २०००) ‘कोल्हापूरभूषण’ पुरस्कार (२ मार्च २०००) महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (मे २०००) भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती. शिवाजी सावंत याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे येथे मृत्युंजय प्रतिष्ठानस्थापन करण्यात आले आहे.
 
या प्रतिष्ठानातर्फे दर वर्षी ’मृत्युंजकार शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य आणि स्मृति समाजकार्य’ या नावाचे दोन पुरस्कार देण्यात येतात.त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मगावी श्रीमंत गंगामाई वाचनमंदिराच्या वतीने प्रतिवर्षी ‘मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार’ दिला जातो.
 
नवी दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठाचा ’मूर्तिदेवी पुरस्कार' दि. ६ फेब्रुवारी १९९६ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते दिल्लीत समारोहपूर्वक प्रदान.