अकोला - किडनी तस्करी प्रकरणामधील सूत्रधार सांगली जिल्हय़ातील शिक्षक शिवाजी कोळी याचा रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने सांगलीतून पासपोर्ट जप्त केला. गत दोन दिवसांपासून पोलीस कोळीला घेऊन सांगलीत झडती घेत आहेत.किडनी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर या गोरखधंद्याच्या साखळीतील रोज एक-एक नवीन गुढ समोर येत आहे. हिमनगाचे टोक असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व खदान पोलिसांच्या पथकाला तपास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यानंतरही या पथकांनी किडनी तस्करी प्रकरणाचा तपास धडाक्यात सुरू केला असून, चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून या गोरखधंद्याची माहिती गोळा केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी शिवाजी कोळीचा पासपोर्ट सांगलीतून जप्त केला आहे. तर, दुसर्या पथकाने विनोद पवारच्या किडनी प्रत्यारोपणाचे अहवाल व बँक खातेपुस्तक जप्त केले. शिवाजी कोळी, विनोद पवार, देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव या चौघांच्या नातेवाईकांचे बहुतांश दस्तऐवज त्यांनी बनावट केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून माहिती गोळा करण्याचे काम तपास पथकांनी सुरू केले आहे. या प्रकरणात आणखी खळबळजनक माहिती उजेडात येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.*किडनी प्रत्यारोपणाचे अहवाल जप्तकिडनी तस्करी प्रकरणातील आरोपी विनोद पवार याच्याकडून त्याच्या किडनी प्रत्यारोपणाचे अहवाल खदान पोलिसांच्या पथकाने जप्त केले आहेत. यासोबतच किडनी प्रत्यारोपण कालावधीत त्यांनी मुक्काम केलेल्या हॉटेलचे दस्तऐवजही ताब्यात घेण्यात आले आहेत. विनोद पवारच्या शरीरात आनंद चावरे याची किडनी असल्याचेही यामध्ये समोर आले आहे.*विनोद पवारचे बँक खाते पुस्तकही ताब्यात!किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी विनोद पवार याच्या बँक खात्याचे पुस्तक खदान पोलिसांच्या पथकाने जप्त केले. मांडवा येथे घेण्यात आलेल्या झडतीत बँक खात्यासोबतच इतरही आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. पवार याने किडनी तस्करीमध्ये अनेकांशी व्यवहार केले असून, यामध्ये मध्यस्थी करून त्याने लाखोंची माया गोळा केली.*कोळी, पवारची आज न्यायालयात पेशीया प्रकरणातील सूत्रधार शिवाजी कोळी व विनोद पवार यांची सोमवारी पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे खदान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या दोघांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करणार आहेत. या दोघांकडून बरीच माहिती घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
शिवाजी कोळीचा पासपोर्ट सांगलीतून जप्त
By admin | Published: December 14, 2015 2:17 AM