शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

शिवाजी पार्कमध्ये सर्वांत उंच राष्ट्रध्वज?

By admin | Published: February 23, 2016 1:17 AM

देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज मुंबईत उभारण्याची मागणी शिवसेनेकडून पुढे आली आहे़ मात्र, यासाठी निवड करण्यात आलेल्या शिवाजी पार्क परिसराला हेरिटेज दर्जा असल्याने याबाबतचा प्रस्ताव

मुंबई : देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज मुंबईत उभारण्याची मागणी शिवसेनेकडून पुढे आली आहे़ मात्र, यासाठी निवड करण्यात आलेल्या शिवाजी पार्क परिसराला हेरिटेज दर्जा असल्याने याबाबतचा प्रस्ताव मुंबई पुरातन वास्तू समितीपुढे पाठविण्यात आला आहे़नवी मुंबईमध्ये २२५ फुटांवर राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे़ मात्र, देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा मान मुंबईला मिळावा, अशी मागणी शिवसेनेकडून पुढे आली होती़ याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत गेल्या वर्षी मंजूर झाल्यानंतर, पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे ३ महिन्यांपूर्वी अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता़ मात्र, राष्ट्रध्वज शिवाजी पार्कवरच उभारण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे़ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाशेजारी अथवा शिवाजी पार्कमध्ये मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्याची मागणी आहे़, परंतु या परिसराला हेरिटेजचा दर्जा असल्याने, यासाठी मुंबई पुरातन वास्तू समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे़ त्यामुळे हा प्रस्ताव पुरातन वास्तू समितीच्या पटलावर आहे़ समितीच्या मंजुरीनंतर यावर अंमल होईल, असे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)शिवाजी पार्कच कशासाठी?मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, जागतिक दर्जाचे शहर आहे़ त्यामुळे या ठिकाणी उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा मान या शहराला मिळावा़ शिवाजी पार्कवर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होत असतात़ महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन असे महत्त्वाचे कार्यक्रमही होत असल्याने, या ठिकाणी हा राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, अशी शिवसेनेची मागणी आहे़