कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील म्याँगजी विद्यापीठ यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. शैक्षणिक, संशोधन क्षेत्रांतील संबंध अधिक बळकट करण्यासह, दोन्ही विद्यापीठांनी परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी हा करार केला आहे.विद्यापीठाच्या नॅनो सायन्स आणि तंत्रज्ञान अधिविभागाच्या सभागृहात या करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि म्याँगजी विद्यापीठातर्फे प्रा. डॉ. जिआँग गिल सिओ यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाचे समन्वयक प्रा. डॉ. पी. एस पाटील, संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाचे समन्वयक ए. व्ही. घुले उपस्थित होते. कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, या करारामुळे दक्षिण कोरिया आणि शिवाजी विद्यापीठाचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल. डॉ. सिओ म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्र्थी दक्षिण कोरियात उत्तम संशोधकीय योगदान देत असून, या कराराच्या माध्यमातून सहकार्यवृद्धी होत आहे. डॉ. एस. डी. जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. पी. तिवारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोरियन, हिंदी भाषा केंद्रांची आवश्यकतासामंजस्य करारात विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आदान प्रदान, संशोधन क्षेत्रात सहकार्य तसेच आर्थिक साहाय्य या बाबींचा समावेश असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. येथे ‘कोरियन भाषा केंद्र’ म्याँगजी तसेच इतर कोरियन विद्यापीठांत ‘हिंदी भाषा केंद्र’ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा म्याँगजीशी सामंजस्य करार
By admin | Published: March 18, 2017 1:03 AM