सासवड : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणरायाचे आज (गुरुवार) सातव्या दिवशी शहरातून ढोल, झांज व ध्वज पथकासह शाही मिरवणूक काढून क:हा व चांबळी नदीच्या संगमावरील पुरातन संगमेश्वर मंदिरासमोर भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
शिवाजी शिक्षणच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयातील गणोशमूर्ती तसेच येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल व गुरुकुल विद्यालय या ठिकाणच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. शिवाजी इंग्लिश स्कूलचे अभिश्री लेझीम पथक, झांज पथक, ढोल पथक व ध्वज पथक तसेच गुरूकुल विध्यालयातील ढोल - लेझीम पथकांनी यात सहभाग घेतला. सासवड येथील नगरपालिका चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली. मुख्य बाजार पेठेतून जयप्रकाश चौक, अमर चौक, चांदणी चौक , भैरवनाथ मंदिर, क:हामाता मंदिर मार्गे संगमेश्वर मंदिरार्पयत मिरवणूक झाली.
ठिकठिकाणी मुले व मुलींच्या ढोल व झांज पथकांनी आपल्या कला सदर केल्या. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणा देत पुरातन संगमेश्वर मंदिरासमोर गणरायाचे भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक रवींद्रपंत जगताप यांच्या मार्गदशर्नाखाली शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक काढून सर्व विद्याथ्र्यांनी नागरिकांची प्रशंसा मिळवली.