मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा करात वाढ करतानाच एसी बस सेवांवरही प्रथमच कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फटका राज्यातील एसटीच्या शिवनेरी एसी बसना बसला आहे. त्यामुळे भाड्यात चांगलीच वाढ झाली असून प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सेवा कराची अंमलबजावणी १ जूनपासून करण्यात आल्याने एसटीचे नवीन भाडेही तेव्हापासूनच लागू करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. दादर ते पुणे रेल्वे स्टेशनच्या भाडे दरात २५ रुपयांची, दादर ते औरंगाबादच्या भाडे दरात ५0 रुपये वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मार्गजुने भाडेनवे भाडेदादर, मैत्री पार्क-पुणे रे.स्टे४२0 ४४५ दादर, मैत्री पार्क-स्वारगेट४३५ ४६0 दादर, मैत्री पार्क-औरंगाबाद१,0३५ १,0९५ दादर, मैत्री पार्क-अहमदनगर७५५ ७९५ दादर-शिर्डी७२७ ७६८ वाशी-कळंबोली-पुणे रे.स्टे३७५ ३९५ वाशी-कळंबोली-स्वारगेट३९0 ४१0 वाशी-कळंबोली-औरंगाबाद९९0 १,0४५ वाशी-कळंबोली-अहमदनगर७0५ ७४५
शिवनेरी महागली
By admin | Published: June 03, 2016 2:09 AM