मुंबई - राज्यातील प्रकल्प इतर राज्यात गेल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरात देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवकांचा उल्लेख शेंबडी पोरं केल्यानंतर आता आदित्य ठाकरेंनीदेवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांचा अपमान केला. याशिवाय, नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हटलं, हे अत्यंत चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द मागे घ्यावे आणि माफी मागावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, खरं तर उपमुख्यमंत्र्यांऐवजी मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देणं अपेक्षित होतं. स्क्रिप्ट वाचून दाखवली तरी चाललं असतं. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समोरासमोर डिबेटला यावं असं खुलं आव्हान आहे असं त्यांनी सांगितले. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन हजार कोटींचा इलेक्ट्रॉनिक हब उद्योग उभारला आहे. वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण दीड लाख कोटींपेक्षा मोठा प्रकल्प दोन हजार कोटींचा असतो हे मला माहीत नाही असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.
तसेच उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका, फॉक्सकॉनचा पहिला प्रकल्प वेगळा होता, महाराष्ट्रात खोटे बोलण्याचा प्रयत्न होत आहे. टाटा एअर बस प्रकल्पात सरकारचे म्हणणे आहे की, टाटाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील वातावरण चांगले नव्हते, त्यामुळे गुंतवणूक निघाली. तर फडणवीस यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव सांगावं. केवळ उद्योगमंत्र्यांशीच नव्हे, तर नितीन गडकरीजींनीही या प्रकरणी पत्रव्यवहार केला आहे, सरकारनेही पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकार आपल्या उणिवा झाकण्यासाठी आरोप करतंय असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिले.
वेदांता फॉक्सकॉनचा घटनाक्रमवेदांता फॉक्सकॉन ५ जानेवारी २०२२ वेदांताला केंद्र सरकारने अप्रुव्हल दिले.१९ जानेवारी रोजी देसाई साहेबांचे पत्र अग्रवाल यांना.फेब्रुवारी २४ रोजी साईट विसिट तळेगावला.३ मे फॉक्सकॉनची तळेगाव साईट विसिट६ मे मी, देसाई साहेब आणि वेदांताची बैठक२४ मे दावोसला अनिल अग्रवाल साहेबांची भेटआम्ही महाराष्ट्रात येण्याची विनंती केली.२४ जून फॉक्सकॉनच्या लोकांची आमची दिल्लीत भेटसरकार पडले.शिंदेंनी फॉक्सकॉनला पत्र लिहिले.१० हजार पेक्षा अधिक सबसिडी मविआने दिली गुजरात पेक्षा अधिक.मग २०२१ सालीच ते जाणार होते तर २०२२ साली ज्या बैठका झाल्या त्याचे काय? असा सवाल आदित्यने उपस्थित केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"