शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

Nitin Gadkari Letter to CM Uddhav Thackeray: “तिथे तुम्ही गप्प का?; नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटरबॉम्बवर शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 4:22 PM

Shivsena Arvind Sawant Reaction on Nitin Gadkari Letter: गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात खळबळ माजली. शिवसेनेचे स्थानिक नेते कंत्राटदारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रोखा अन्यथा महामार्गाच्या कामावर गंभीरपणे विचार करावा लागेल असा इशारा गडकरींना मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दिला होता. त्यावरून शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सांवत म्हणाले की, गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत ते खरेच शिवसैनिक आहेत की उगाच आमच्यावर नावानं कुणी बोंबाबोंब करतंय ते बाहेर येईल. परंतु शिवसेनेचा उल्लेख का करता? मुंबई गोवा रोड आम्ही करत नाही पण तिथे काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे ही माणसं तुमच्यासोबत आहेत तिथे तुम्ही गप्प का? असा सवाल त्यांनी नितीन गडकरींना विचारला आहे.

EXCLUSIVE नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटरबॉम्ब'; शिवसेनेच्या दहशतीपायी राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद करावी लागतील!

तसेच नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. बाळासाहेब नेहमी गडकरींचा उल्लेख रोडकरी असं करत. अलीकडे मुख्यमंत्र्यांनीही गडकरींच्या कामाचं कौतुक केले. ते डायनॅमिक व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्राची ताबडतोब दखल घेतली आहे. या घटनेची पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेत. नितीन गडकरींबद्दल पूर्ण आदर आहे परंतु त्यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळला असता तर बरं झालं असतं. शिवसेना कधी विकासकामांना विरोध करत नाही असंही अरविंद सावंत म्हणाले.

काय आहे प्रकरण?

गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे.हा अनुभव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत किंवा कसे या बद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे. ही कामे आहेत त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघातांचे प्रमाण वाढेल आणि जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल. हे असेच चालत राहिले तर केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल.ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.  

गडकरी  पत्रात काय म्हटले?

१.अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज २ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (१२ किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

२.या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंत