औरंगाबाद – १९८८ पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मी सगळीकडे संभाजीनगर बोलतो. २ वर्ष कायदेशीर तयारी केली आहे. आम्ही दोन अडीच वर्ष काम करतोय. उद्धव ठाकरे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून संभाजीनगर केले नाही हा त्यांचा दोष आहे असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेदेवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये आले तेव्हा त्यांना भगवी शाल द्यायचो. संभाजीनगरबाबत विचारणा केली तर होऊन जाईल इतकं गोड बोलून सांगायचे. पण एकदाही त्यांनी ते केले नाही. मग बहिरे कोण?, आम्ही १९८८ पासून संभाजीनगर म्हणतो. टाळ्या वाजवण्यासाठी उगाच टीका करू नये. मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे. बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे कायदेशीर रित्या संभाजीनगर करण्यासाठी तयारी करत आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच औवेसी ही भाजपाची बी टीम आहे. वंचित आघाडीला भाजपाने पाठिंबा दिला होता. तुम्ही आमच्यावर टीका करू नका. देवेंद्र फडणवीस ५ वर्ष मुख्यमंत्री असताना संभाजीनगर करावं असा ठराव पास केला होता. त्यांनी भाषणात खोटं बोलू नये. ५ वर्ष का हालचाल केली नाही. भाजपावालेच खोटे बोलतात. मला बहिरे करायला तुम्ही डॉक्टर आहात का? असा सवाल चंद्रकांत खैरेंनी केला आहे.
दरम्यान, विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र पाठवलं. मी स्वत: भेटलो तेव्हा कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेऊ बोलले. मग अद्याप का झाले नाही? भाजपा वारंवार खोटे बोलत आहे. मी उघड करत नाही परंतु संभाजीनगरबाबत कायदेशीर काम सुरू आहे. विभागीय प्रस्ताव तयार झाले आहेत. आम्ही गप्प बसलो नाही असंही चंद्रकांत खैरेंनी दावा केला आहे.
वो खैरे व्हा आता भैरे
औरंगाबदचा कायम झाला खसरा, भाजपचं सरकार येत नाही, तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असे फडणवीसांनी म्हटले. तसेच, तुमचे कालचे भाषण पूर्णत: सोनियांना समर्पित होते. आम्ही तुमच्याच लाईनवर बोलतो, हे सांगण्यासाठी काँग्रेसची भाषा त्यांनी वापरली. संघावर जशी काँग्रेस टीका करते, तीच भाषा त्यांनी वापरली. आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण, मुख्यमंत्री म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होते, असे म्हणत फडणवीसांनी औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, आता भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असेही फडणवीस यांनी म्हटले.