मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज यांना पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू आहे. राज ठाकरे यांच्यावर 1 जून रोजी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. कोरोना डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्याने, लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरेंच्या प्रकृतीसाठी आणि आरोग्यासाठी मनसैनिकांकडून प्रार्थना केली जात आहे. याच दरम्यान शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनीही राज यांना लवकर बरं व्हा असं म्हटलं आहे.
दीपाली सय्यद यांनी याचवेळी "राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) साहेब एकटे पडतील" असं म्हणत टोला लगावला आहे. दीपाली यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजून अर्धवट आहे" असं सय्यद यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मनसे आणि महाराष्ट्र भाजपाला ही टॅग केलं आहे
"मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा"
"चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतून अजितदादांचे नाव गायब झाले कसे? स्थानिक प्रतिनिधींचे पासेस कुठे? तुम्ही स्टेजवर मग स्थानिक प्रतिनिधींना अशी वागणूक का? मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत. PMO ने माफी मागा, ही भाजपाची सभा नव्हे. जनतेला उत्तर द्या!" असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं होतं.