शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

फडणवीस सरकारच्या 'त्या' प्रकल्पासाठी शिवसेना आग्रही; अजितदादा 'हायपर' होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 9:29 AM

हायपरलूप प्रकल्पाबद्दल अजित पवारांनी प्रतिकूलता दर्शवूनही शिवसेना आग्रही

ठळक मुद्देहायपरलूप प्रकल्पासाठी शिवसेना आग्रहीहायपरलूप प्रकल्प खर्चिक असल्यानं अजित पवार फारसे उत्सुक नाहीतहायपरलूप प्रकल्पावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद

मुंबई: स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जाणारे, आपली नाराजी लपवून न ठेवता ती अगदी उघडपणे व्यक्त करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेच्या भूमिकेमुळे पुन्हा नाराज होण्याची शक्यता आहे. अवाढव्य खर्चामुळे अजित पवार फारसे अनुकूल नसलेला हायपरलूप प्रकल्प राबवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी भूमिका मांडल्यानं शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा एकदा मतभेद असल्याचं समोर आलं आहे. गहुंजे-ओझर्डे मार्गावर हायपरलूप प्रकल्पासाठी चाचपणी सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यासंदर्भात सादरीकरण झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. त्यामुळे हायपरलूपसाठी शिवसेना आग्रही असल्याचं दिसत आहे. पुण्यातल्या मावळ तालुक्यात गहुंजे आणि ओझर्डे ही दोन गावं आहेत. या दोन गावांमधलं अंतर जवळपास 105 किलोमीटर इतकं आहे. रस्त्यानं हे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानामुळे या दोन गावांमधलं अंतर कापण्यासाठी अवघी पाच ते दहा मिनिटं लागू शकतात.हायपरलूप या महागड्या प्रकल्पापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी महत्त्वाची आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलं होतं. तर जगात कुठेही हा प्रकल्प झालेला नाही. आधी कुठेतरी हा प्रकल्प होऊ द्या. या प्रकल्पाचा प्रयोग आपल्याकडे कशाला?, असा सवाल उपस्थित करत हायपरलूपसारखा खर्चिक प्रकल्प राज्याला परवडणारा नसल्याचं अजित पवार म्हणाले होते. मात्र आता एकनाथ शिंदेंनी हायपरलूपसाठी आग्रही भूमिका घेतल्यानं अजित पवार नेमकं काय करणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. याआधी एल्गार परिषद, मुस्लिम आरक्षणावरुनही महाविकास आघाडी सरकारमधल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतले मतभेद समोर आले होते. एल्गार प्रकरणाचा तपास राज्य सरकारनं एसआयटी अंतर्गत करावा यासाठी राष्ट्रवादी आग्रही असताना मोदी सरकारनं हा तपास एनआयएकडे सोपवला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील मंजुरी दिली. तर मुस्लिम समाजाला आरक्षण देणारं विधेयक लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलं जाईल. यानंतर या संदर्भात अध्यादेशही काढला जाईल, असं अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितल्यावर असा कोणताही विषय अधिकृतपणे माझ्यापर्यंत आलेला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारHyperloopहायपर लूपEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस