राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र सरकारला मोठा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम तब्बल 12 हजार कोटी रुपये आहे. यावरून भाजपानेशिवसेना आणि आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सोशल मीडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यानंतर आता शिवसेनेने याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Shivsena Kishori Pednekar) यांनी आशिष शेलारांवर हल्लाबोल केला आहे. आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का? असं म्हणत घणाघात केला आहे. तसेच प्रत्येक वेळी सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते शेलार असतील म्हणून त्यांचं डोकं ठिकाणावर नाही असं वाटतं असंही सांगितलं. "शेलार महापालिका करून गेलेले आहे. कधी कधी प्रश्न पडतो आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?... शेजारच्या गल्लीमध्ये मांजरीने बाळं दिली तरी सांगतील ही शिवसेनेमुळे झाली, इतकं डोकं फिरलेलं आहे."
"प्रत्येक वेळी सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते आशिष शेलार"
"मला असं वाटतं लवादा हा राज्य सरकारच्या अखत्यारित येतो हे नक्कीच आहे. मुंबई महानगरपालिकेने कचरा सिस्टमवर अनेकदा काम केलंय, त्याचं तुम्ही स्वत: कौतुक देखील केलं आहे. प्रत्येक वेळी सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते आशिष शेलार असतील म्हणून त्यांचं डोकं ठिकाणावर नाही असं वाटतं" असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?"
आशिष शेलार यांनी "कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. प्रदूषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे लवादाने म्हटलेय. हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता... सांग सांग भोलानाथ... हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून...अडीच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून... सोशल मीडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.