22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव; राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 03:45 PM2020-12-28T15:45:40+5:302020-12-28T15:46:21+5:30

संजय राऊत म्हणाले, भाजपच्या हस्तकांनी त्या 22 आमदारांवर ईडीचा दबाव आणून, त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगितले आहे.

Shivsena leader MP sanjay raut addressing pc over ED notice issue | 22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव; राऊतांचा गंभीर आरोप

22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव; राऊतांचा गंभीर आरोप

googlenewsNext


मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगण्यात आले आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते.

...पण मीही त्यांचा बाप आहे -
राऊत म्हणाले, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि काही हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची पूर्ण तयारी केली आहे, असे सांगत ते मला धमकावत आहेत. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, अशी धमकीही मला दिली जात आहे. पण मीही त्यांचा बाप आहे, असेही राऊत म्हणाले.

...यामुळेच सरकारच्या खंद्या समर्थकांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम सुरू 
भाजपच्या हस्तकांनी त्या 22 आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगितले आहे. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकून आहे. आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. आमची तयारी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे, असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे. मात्र, हे हस्तक सरकार पाडण्यात अपयशी ठरले, कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. यामुळेच सरकारच्या खंद्या समर्थकांना आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा दावाही राउतांनी यावेळी केला.

पूर्वी सीबीआय, ईडीच्या कारवाईचे लोकांना गांभीर्य वाटायचे -
'केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना, असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. पूर्वी सीबीआय, ईडीने कारवाई केली, की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचे. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षानं भडास काढणे हे लोकांनी गृहित धरले आहे,' अशा शब्दांत राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

Web Title: Shivsena leader MP sanjay raut addressing pc over ED notice issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.