शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव; राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 3:45 PM

संजय राऊत म्हणाले, भाजपच्या हस्तकांनी त्या 22 आमदारांवर ईडीचा दबाव आणून, त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगितले आहे.

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगण्यात आले आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते.

...पण मीही त्यांचा बाप आहे -राऊत म्हणाले, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि काही हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची पूर्ण तयारी केली आहे, असे सांगत ते मला धमकावत आहेत. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, अशी धमकीही मला दिली जात आहे. पण मीही त्यांचा बाप आहे, असेही राऊत म्हणाले.

...यामुळेच सरकारच्या खंद्या समर्थकांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम सुरू भाजपच्या हस्तकांनी त्या 22 आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगितले आहे. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकून आहे. आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. आमची तयारी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे, असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे. मात्र, हे हस्तक सरकार पाडण्यात अपयशी ठरले, कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. यामुळेच सरकारच्या खंद्या समर्थकांना आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा दावाही राउतांनी यावेळी केला.

पूर्वी सीबीआय, ईडीच्या कारवाईचे लोकांना गांभीर्य वाटायचे -'केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना, असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. पूर्वी सीबीआय, ईडीने कारवाई केली, की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचे. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षानं भडास काढणे हे लोकांनी गृहित धरले आहे,' अशा शब्दांत राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा