मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची भेट घेतली. पण, त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही.
ममतांनी मुख्यमंत्र्यांची विचारपूस केलीया भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधला. 'बंगालची वाघीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मुंबईत शासकीय कामासाठी दौरा असला तरी आल्यावर त्या ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. आदित्य ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायचं होतं, पण अजूनही त्यांना बायो बबलमध्ये ठेवण्यात आल्याने भेट टाळली. ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली,'अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
भाजपकडून यंत्रणांचा गैरवापरराऊत पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्रात भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशाच प्रकारचं काम भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करत आहेत. आम्ही त्यांना पुरुन उरलो आहोत आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रसुद्धा या सरकारी दहशतवाद्यांचा सामना करेल अशी खात्री आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्याचं राऊतांनी सांगितलं.
काँग्रेस-तृणमूल वाद अंतर्गतपश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस पक्ष राहिले नाहीत. भाजपाच्या बँडबाजाची हवा काढून टाकली आणि मोठा विजय मिळवला. बरेचसे लोक पुन्हा ममतांकडे आले आहेत. ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमधील वाद अंतर्गत आहे. पण समर्थ आघाडी उभी करायची असेल तर सगळ्यांना एकत्र घेऊनच जावे लागेल असं शरद पवारांचं मत आहे,' असंही राऊत म्हणाले.
शरद पवार आणि ममतांची भेट महत्वाचीवाघिणीप्रमाणे ममता बंगालमध्ये लढल्या आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावलं. शद पवार आणि ममता यांची भेट देशाच्या राजकारणच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. राजकीयदृष्ट्या शरद पवारांच्या उंचीचा एकही नेता या देशात नाही. त्यांचा अनुभव दांडगा आहे. या भेटीचे आम्ही स्वागत करतो, असं राऊत म्हणाले.