शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

अंधार अन् भरपावसात बॉर्डरवरुन निसटला शिवसेना आमदार; ४ किमीचा थरारक पायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 8:19 PM

मध्यरात्रीनंतर ते याठिकाणी पोहोचल्यानंतर वर्षा बंगल्यावरच त्यांची सोय करण्यात आली. यामुळे दिवसभरात त्यांचे दर्शन बाहेर कोणालाही घडले नाही.

चेतन धनुरे

उस्मानाबाद - शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे(Shivsena Eknath Shinde) यांच्यासह सूरत गाठलेले आमदार स्वत:हून गेले की नेले, यावरुन मंगळवारी दिवसभर चर्चेची राळ उडाली असतानाच एक खळबळजनक माहिती लोकमतच्या हाती विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने प्राप्त झाली. विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर डिनरसाठी जायचे सांगून अनेक आमदारांना वेगवेगळ्या वाहनांनी सूरतला नेल्याची माहिती समोर येत आहे. या वाहनातून उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे नाट्यमयरित्या गुजरात बॉर्डरहून निसटले.

सोमवारी विधानपरिषदेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचे आहे असे आमदारांना सांगितले. यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवून बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मात्र, ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही वाहने थांबत नव्हती. काही तासाचा प्रवास झाल्यानंतर चलबिचल सुरु झाल्याने पुढे शिंदे साहेब थांबले आहेत, त्यांना भेटू, असे सांगून वाहने तशीच पुढे नेण्यात आली. ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती. 

याचवेळी आमदार कैलास पाटील यांच्या मनात पाल चुकचुकल्याने ते लघुशंकेचा बहाणा करत वाहनाबाहेर आले. यानंतर अंधारात कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. अंधाराचा रस्ता, रिमझिम पावसाच्या कोसळणाऱ्या सरी झेलत कैलास पाटील यांनी पायी प्रवास सुरुच ठेवला. जवळपास ४ किलोमीटर अंतर पावसात भिजत अंधारातून कापले. यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीवरुन लिफ्ट घेतली. पुढे तो दुचाकीस्वार गाव आल्याने थांबल्यामुळे पुन्हा पायी प्रवास सुरु केला. काही वेळातच एका ट्रकला लिफ्ट मागून त्यांनी दहिसरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. तेथून पुढे आपल्या वाहनाने थेट वर्षा बंगला गाठला.

मध्यरात्रीनंतर ते याठिकाणी पोहोचल्यानंतर वर्षा बंगल्यावरच त्यांची सोय करण्यात आली. यामुळे दिवसभरात त्यांचे दर्शन बाहेर कोणालाही घडले नाही. बैठकीला जाणाऱ्या आमदारांतही ते दिसले नाहीत. बैठकीनंतर बाहेर पडतानाही कैलास पाटील दिसले नाहीत. त्यांना सुरक्षितरित्या बंगल्यावर ठेवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना दमदाटी अथवा दबाव टाकून नेलंय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेKailas Patilकैलास पाटील