पुणे -काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जे बोलतात अथवा जे सांगतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध येत नाही, असे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाहीत, असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे. (Sanjay raut, Ashok chavan)
राऊत म्हणाले, “अशोक चव्हाण जे बोलतात अथवा जे काही सांगतात, त्याच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट काहीही संबंध येत नाही. हा विषय कॅबिनेटचा आहे आणि तो कॅबिनेटमध्ये सुटू शकतो.”
काय म्हणाले होते अशोक चव्हाण?माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्य सरकारमध्ये काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, असे चव्हानांनी म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली.
"...म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान"; संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका
चव्हाण म्हणाले होते, काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत, आम्ही मुख्यमंत्र्यांना २-३ वेळा सांगितले, तीन पक्षांचे सरकार आहे, असं असताना आमच्याही महापालिकेला निधी मिळाला पाहिजे. आम्हालाही ताकद मिळाली पाहिजे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली
तसेच निवडणुकीनंतर भाजपाचं सरकार येऊ नये यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, शिवसेनेची आघाडी करायची की नाही? याबाबत भरपूर चर्चा झाली, सोनिया गांधी आमच्यावर नाराज होत्या. परंतु आमची मते आम्ही पक्षनेतृत्वाकडे मांडली, भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेला पाठिंबा दिला, भाजपाचं सरकार नको, त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी भूमिका पटवून सांगितले, त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये आली असंही अशोक चव्हाणांनी सांगितले.
Sanjay Raut : " काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या..! "