शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

Sachin Vaze Arrested : "लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात, तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 11:32 AM

Shivsena Sanjay Raut Tweet Over Sachin Vaze Arrested : सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.

मुंबई - एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. वाझेंच्या अटकेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

"लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात. पण तुम्ही केलेलं चांगल काम ते हिरावून घेऊ शकत नाही. तुमचं वर्णन त्यांनी कसंही केलं, तरी तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील" असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. 

सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

"सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल"

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची मागणी आहे त्यांचे सरकार सचिन वाझेंचे प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत होते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते हे संपूर्ण देशाने पाहिले. अखेर त्यांना NIA ने अटक केली आता तरी महाराष्ट्र सरकार देशाची माफी मागत सचिन वाझेंची Narco टेस्ट करणार का?" असा सवाल देखील राम कदम यांनी विचारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना स्वत: याचं उत्तर द्यावं लागेल असं म्हटलं आहे. आज (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय, त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsachin Vazeसचिन वाझेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रArrestअटकUddhav Thackerayउद्धव ठाकरे