शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे असेल मिशन
2
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
3
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
4
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
5
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
6
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
7
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
8
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
9
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
10
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
11
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
12
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
13
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
14
उल्हासनगरचे माजी नगरसेवक गोदुमला किशनानी यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी
15
IND vs AUS: सर डॉन ब्रॅडमन यांच्या 'बॅगी ग्रीन' टोपीचा लिलाव, मिळाली मोठी किंमत! आकडा ऐकून थक्क व्हाल
16
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे
17
“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार
18
राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं
19
"भारत, तुम्हारी मौत...!; 20 वर्षांनंतर दहशतवादी अझहरचं भाषण, पंतप्रधान मोदी अन् नेतन्याहू यांच्याबद्दल ओकली गरळ
20
Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठिशी उभी आहे - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:14 PM

शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पाठिंशी भक्कमपणे उभी आहे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले.

मुंबई, दि. 12 - शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पाठिंशी भक्कमपणे उभी आहे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले. एमआयडीसी जमीन घोटाळावरुन विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर केलेल्या आरोपांसंबंधी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.  राजकारणाची पातळी खूप घसरलेली आहे. आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. आरोप कर राजीनामा घे हा पायंडा पडला तर महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं नाही. त्यांना  स्वतःच्या कृत्याची लाज वाटत नाही हे भयानक आहे असे उद्धव म्हणाले. 

सुभाष देसाईंनी माझ्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार त्यांनी राजीनामा सादर केला मात्र मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला. मुख्यमंत्र्यांनी निःपक्षपाती चौकशी करण्याचे वचन दिले आहे, तशी चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल असे उद्धव यांनी सांगितले.  एमआयडीसी जमीन घोटाळावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं सांगत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला येथील एमआयडीसीने संपादित केलेली 400 एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली, असा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 

'मी सकाळी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता. त्यांनी तो स्विकारला नाही. मात्र आपण चौकशीपसाठी पुर्णपणे तयार असल्याचं', अशी माहिती सुभाष देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. आज सकाळी मी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत राजीनामा दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नि:ष्पक्षपातीपणे चौकशी होईल. चौकशी होईपर्यंत राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगितलं. यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांसोबत चर्चा केली, आणि राजीनाम्याची गरज नसल्यावर एकमत झालं. जी चौकशी होईल ती मान्य असेल, आणि त्यांचा निर्णयही मान्य असेल', असं सुभाष देसाई बोलले आहेत.