शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

शिवसेना अजून किती अपमान सहन करणार - राज ठाकरे

By admin | Published: February 16, 2017 8:41 PM

शिवसेना म्हणते सत्तेतून बाहेर पडू, मग थांबला कशाला ? शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंकडे ढुकूंनही पाहिलं नाही

ऑनलाइन लोकमतपुणे, दि, 16 - मुंबई, पुण्यासह राज्यातील दहा महानगरपालिकेमध्ये प्रताराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत शिवसेना-भाजपावर ठाकरी शैलीत घणाघाती टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले सत्तेसाठी शिवसेना अजून किती अपमान सहन करणार आहे. शिवसेना म्हणते सत्तेतून बाहेर पडू, मग थांबला कशाला ? शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंकडे ढुकूंनही पाहिलं नाही. खरे तर त्यावेळीच शिवसेने सत्तेतून बाहेर पडायला हवं होतं. शिवसेना -भाजपाने 25 वर्ष सत्तेत राहून काय गोट्या खेळल्या काय?, यांच्या सभा आहेत, की आखाडे तेच समजत नाही. यांच्या भांडणाचा जनतेशी काहीही संबध नाही, लोकांना मुर्ख बनवण्याचा धंदा चालवला आहे. पुर्वी जसे काँग्रेस - राष्ट्रवादी होते तसेच आता शिवसेना-भाजपा आहेत. नाशिकमध्ये ७७ गुन्हेगारांना भाजपनं निवडणुकीत उमेदवारी दिली आहे, 1952 साली जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 2014 सालची परिस्थिती आता राहिलेली नाही सर्व काही बदललं आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिक महानगर पालिकेत आणि पुण्यात मनसे नगरसेवकांनी केलेल्या कामाचं सादरीकरण करण्यात आले.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

शिवसेना भाजपच्या सभा आहेत का आखाडे आहेत हे कळत नाहीये, सगळं ठरवून चाललंय, निवडणुकांनंतर एकत्र यायचं आणि लोकांना मूर्ख बनवत रहायचनाशिकमध्ये सेना भाजपने ७७ गंभीर गुन्हे असलेल्या उमेदवारांना तिकीट दिलंय. हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरापुण्यात भाजपचे उमेदवार हे पक्षातले जुने जाणते ठरवत नाहीत तर एक बिल्डर ठरवतो. निष्ठावानांना तिकीट नाहीभारतीय जनता पक्ष एकेक उमेदवार फोडण्यासाठी ५० लाख ते १ कोटी रुपये देत आहेतशिवसेना भाजपकडे सांगण्यासारखं एकही काम नाही म्हणून हे एकमेकांच्यात भांडून तुम्हाला फसवत आहेतपुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी १५ वर्षं, मुंबईत सेना-भाजप २५ वर्षं सत्तेत . इतकी वर्षं सत्तेत असणाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारणार आहात की नाही?कुठलीही कामं न करता वर्षानुवर्षं सेना-भाजप,काँग्रेस-राष्ट्रवादीला मतं कशी मिळतात? नाशिकमध्ये सत्तेत आल्यावर विचारता की काय केलं नाशिकमध्ये?मतदान करताना तुम्ही जर माझ्या पुढच्या पिढयांना काय मिळणार आहे याचा विचार करणार नसाल तर मग काय उपयोग. मग ही शहरं अशीच बरबाद होणारशहरातल्या नागरिकांना उत्तम सोयी सुविधा देणं, ती सुंदर बनवणं, घडवणं हे माझं पॅशन आहेनाशिकमध्ये ५ वर्षांत ५६० किलोमीटरचे रस्ते तयार केलेनाशिकच्या पुढच्या ४० वर्षांचा पाण्याची गरज भागवण्यासाठी मुकणे धरणातून थेट पाईपलाईन टाकली आहे. २० लाख लिटर्सच्या १७ टाक्या उभारल्याडम्पिंग ग्राउंडचा त्रास जसा इतर शहरात असतो, तसा नाशिकमध्ये पण होता, पण आम्ही तिथे घनकचऱ्यातून खत प्रकल्प उभारलानाशिकमध्ये कचरा उचलण्यासाठी जीपीएस यंत्रणेने सुसज्ज घंटागाड्या धावू लागल्यातनाशिकमध्ये लहान मुलांना ट्रॅफिकचे धडे मिळावेत म्हणून 'चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क' उभारलंमा.बाळासाहेबांचं स्मारक कोणी पहिलं केलं या वादात मला जायचं नाही. मला जे योग्य वाटलं ते स्मारक नाशिकमध्ये उभारलंमा. बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं नाशिकमध्ये ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय उभारलंशिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती मा.बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्र संग्रहालयात आहेबोटॅनिकल गार्डनचा कायापालट व्हावा यासाठी रतन टाटांना अर्थसहाय्य करण्याची विनंती केली.त्यांनी तात्काळ मान्यता देत, १४ कोटी रुपये दिलेगोदावरी नदीच्या काठी गोदापार्क उभारावं म्हणून मुकेश अंबानींशी बोललो आणि त्यांनी होकार देत गोदापार्कच्या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिलानाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या खाली एल अँड टी कंपनीशी बोलून संपूर्ण सुशोभीकरण करून घेतलं. त्यामुळे कोणतंही अतिक्रमण तिथे होत नाहीनाशिकमध्ये होळकर ब्रिजवर सुंदर वॉटर कर्टन उभारला. आणि हे उभारलं पुण्यातील अजय आणि विजय शिर्के यांनी. अशी विनंती पुण्यात का नाही झालीगेल्या ५ वर्षात नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही,ज्यांना हा मार्ग मान्य नव्हता ते पक्ष सोडून गेलेपुण्यात लाल महालाच सुशोभीकरण बाळा शेडगेनी केलं,वसंत मोरे यांनी बायो गॅस प्रकल्प, वागसकरांनी उद्यान, चाकणकरांनी जलतरण तलाव उभारलापुण्यात किशोर शिंदेनी उत्कृष्ट फुटपाथ उभारले, नीलिमा कुलकर्णीनी लकाकी तलाव सुशोभीकरण, मॉडेल कॉलनीतील सर्कलचा कायापालट केलापुण्यात अस्मिता शिंदेनी बॅडमिंटन कोर्ट ,अनिल राणेंनी अग्निशमन म्युझियम, कनोजिया ताईंनी उत्तम उद्यान उभारलंपुण्यात वसंत मोरेंनी सगळ्यात उंच झेंडा उभारला लहान मुलांसाठी फुलराणी सुरु केलीपुण्यात मुळा मुठेचा काठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा करून दाखवेननाशिकमध्ये मी जे बोललो ते करून दाखवलं, मला पुण्याची सत्ता एकदा हातात द्या मी या शहराचा पूर्ण कायापालट करून दाखवेन