मिरज : राज्यातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर मंगळवारी रजेत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे आमदार सुरेश खाडे BJP MLA Suresh Khade यांच्या कार्यालयावर दगडफेक व टरबूज फेकून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी सात शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मंगळवारी दिवसभर राजकीय घडामोडीत शिवसेनेचे काही आमदार गुजरातमधील सूरतमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले. ते भाजपच्या संपर्कात असल्याने महाआघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चेने शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत मिरजेत भाजपचे आमदार खाडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करून निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस ठाण्यासमोरच घडलेल्या या घटनेमुळे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, गजानन मोरे, किरणसिंग राजपूत, विजय शिंदे महादेव हुलवान, प्रकाश जाधव, रुक्मिणी आंबेगिर आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सांगलीत गाडगीळांच्या कार्यालयास बंदोबस्त
सांगली : भाजप नेत्यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन होण्याच्या शक्यतेने सांगलीत भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर दुपारनंतर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी भाजपने विधान परिषदेच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंदोबस्त कायम होता. मिरजेत भाजपचे आ. सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर दगडफेक, टरबूजफेक झाल्यानंतर सांगलीत पुन्हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला..