शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

By admin | Published: July 11, 2017 3:40 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना झाला

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना झाला याची माहिती मिळावी, या मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके(आरडीसीसी) समोर सोमवारी ढोल बजाओ आंदोलन केले.शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख रवी मुंडे, सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, बबन पाटील, अलिबाग शिवसेना प्रमुख दीपक रानवडे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांची या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्या वेळी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती त्यांनी शिष्टमंडळास दिली. राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीकरिता आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने माहिती देताना नाईक म्हणाले, २०१५-१६ मधील खरीप हंगामात १९ हजार ३५० सभासदांना रक्कम ६७३३.७० लाख रुपये, रब्बी हंगामात ३ हजार ४२० सभासदांना १२३४.३६ लाख कर्जवाटप झाले. त्यापैकी ३०जून २०१६ पर्यंत खरीप व रब्बी हंगामातील १७ हजार ९२१ सभासदांची ७३६९.५४० लाख रु. रक्कम वसूल झाली. याचाच अर्थ ३० जून २०१६ अखेर १ हजार ४२९ सभासदांकडून ५९८.५२ लाख इतकी रक्कम येणे बाकी होती. बँकेची ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून आजपर्यंत जाहीर केलेल्या योजनेच्या परिपत्रकानुसार आहे. सहकार खात्याकडून याचे लेखापरीक्षण झाले नसल्याने या माहितीमध्ये लेखापरीक्षणानंतर बदल होवू शकतो. तसेच शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष सरकारकडे या कर्जमाफीसंदर्भात अनेक नवीन मागण्या करत असल्याने तसेच सरकारतर्फे योजनेमध्ये सुध्दा बदल केला जात असल्याने या माहितीमध्ये बदल होवू शकतो, असे नाईक यांनी सांगितले.