शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

शिवसेनेची यादी ‘मातोश्री’वर

By admin | Published: January 26, 2017 2:13 AM

महापालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने, उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ उडाली असून,

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने, उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ उडाली असून, शिवसेनेने दोन दिवसांत साडेआठशे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर, बुधवारी उमेदवारांच्या नावांची यादी ‘मातोश्री’ वर सादर केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि. २७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असून, अद्याप सेना-भाजपाची युती वा कॉँगे्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फैसला झालेला नाही. मनसेने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिल्यामुळे त्यांची कोणाशी बोलणी करण्याचा प्रश्न निर्माण होत नसला, तरी ज्या प्रभागात उमेदवार नाही, अशा प्रभागात समविचारी पक्षांची छुपी युती करून पॅनल पूर्ण करण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या असल्या, तरी शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दोन दिवसांत साडे आठशे इच्छुकांच्या मुलाखती सेनेच्या नेत्यांनी घेतल्या आहेत. काही प्रभागांमध्ये अगोदरच उमेदवार निश्चित झालेले असून, काही प्रभागात ऐन वेळी इच्छुक मुलाखतीसाठी दाखल झाले आहे. सेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी ज्या प्रभागात रस्सीखेच आहे, अशा ठिकाणच्या उमेदवारांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. तथापि, विद्यमान नगरसेवकांचा अपवाद वगळता, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तरी नव्याने झालेली प्रभागरचना व झालेला विस्तार पाहता, पॅनलमधील उर्वरित अन्य उमेदवारांबाबतही विचार केला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते व काही पदाधिकारी मुंबईला रवाना झाले असून, दोन दिवस झालेल्या मुलाखतींचा अहवाल ते मातोश्रीला सादर करणार आहेत. त्यानंतर, साधारणत: रविवारी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.