शिवसेनेचा जाहीरनामा : सीसीटीव्ही अन् शहर वायफाय करण्यावर भरसोलापूर : सोलापूर शहरात संपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही लावणे़़़ शहरात वायफायची सुविधा निर्माण करणे़़़ ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करात सवलत देणे़़़ एकदिवसाआड पाणीपुरवठा करणे आदी विविध मुद्यांवर शिवसेनेच्या वचननाम्यात भर देण्यात आला़ सेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, शहराध्यक्ष प्रताप चव्हाण आदींच्या उपस्थितीत या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले़सोलापूर श्रमिक पत्रकार संघात गुरुवारी सायंकाळी या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले़ यावेळी युवा सेनेचे गणेश वानकर, बाबुराव गोमे, शाहू शिंदे, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, बाबुराव जमादार, विजय पुकाळे, महादेव बिद्री आदी उपस्थित होते़ शहरात उड्डाणपूल आणि पर्यायी रस्ते करुन मॉडेल रस्ते करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे यावर आमचा भर राहील असे कोठे यांनी सांगितले़ सोलापूर शहरातील जलवितरण व्यवस्था मुंबईच्या धर्तीवर करु, एक दिवसाआड तरी नक्की पाणी आम्ही देऊ़ शहरात उद्योग वाढले पाहिजेत आणि शहर पर्यावरण स्नेही झाले पाहिजे याचादेखील आम्ही आमच्या वचननाम्यात समावेश केला आहे़ शहरात गारमेंट पार्क, चादर आणि टॉवेल पार्क करण्यासाठी शासनाची मदत घेऊ आणि रोजगार निर्मिती करू़ महिला बालकल्याण समितीच्या योजना राबविणे, बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना राबविणे, कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे तसेच परिवहनला शासनाचा अधिकार देऊन सक्षम करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे कोठे यांनी सांगितले़ --------------------मी काय पालकमंत्री आहे का ?आपण विडी घरकूल सोडून शहरात इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी जात नाहीत असा सेनेच्या उमेदवारांचा आरोप आहे असा प्रश्न विचारता माझ्या मुलाला निवडून आणण्यासाठी एका प्रभागात बसून राहायला मी काय पालकमंत्री आहे का, असा टोला त्यांनी लगावला़ कोणालाही विचारा मी अनेक प्रभागात प्रचारासाठी गेलो आहे़ माजी आमदार खंदारे यांनी कोठेसेना म्हटले यात काही अर्थ नाही़ त्यांच्या मुलाला हवे त्या ठिकाणी तिकीट दिले नाही, याचा त्यांना राग आहे़ ते मंत्री होते, सेनेचे काहीही काम करीत नाहीत़
शिवसेनेचा जाहीरनामा : सीसीटीव्ही अन् शहर वायफाय करण्यावर भर
By admin | Published: February 17, 2017 12:47 PM