ठाणे : ठाण्याच्याच नव्हे, तर शिवसेनेच्या २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. स्वबळावर लढलेल्या शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट कौल देत ६७ जागा दिल्या आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या जागांमध्ये १५ जागांची वाढीव भर पडली आहे. आयारामांवर भिस्त ठेवत स्वबळावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला २३ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाचे आपले स्थान कायम राखले. सर्वांत दारूण स्थिती झाली ती काँग्रेसची. त्यांना एका पुरस्कृत सदस्यासह चार जागा मिळाल्या, तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही. मुंब्रा परिसरात एमआयएमने मिळवलेल्या दोन जागा हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याचा इशारा आहे. ज्या दिवा परिसरात मुख्यमंत्र्यांनी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली तेथे दोन्ही पक्षांना एकही जागा मिळाली नाही. उलट एकही सभा न घेता शिवसेनेने तेथील आठ जागांवर मुसंडी मारली. मात्र त्या भागाचे आमदार असलेल्या शिवसेनेच्या सुभाष भोईर यांच्या मुलाला पराभवाचा धक्का बसला. वाढीव मतदानाचा भाजपाला फायदा होईल, हा ठोकताळाही मतदारांनी खोटा ठरवला. ठाणेपक्षजागाभाजपा२३शिवसेना६७काँग्रेस०३राष्ट्रवादी३४इतर0२
शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची सेना
By admin | Published: February 24, 2017 5:13 AM