शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

गणेशोत्सवातही ‘शिवशाही’ अवतरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2016 3:58 AM

एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसची घोषणा केली. जवळपास ५00 एसी बस टप्प्याटप्प्याने ताफ्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

मुंबई : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसची घोषणा केली. जवळपास ५00 एसी बस टप्प्याटप्प्याने ताफ्यात येतील, अशी माहिती देण्यात आली. मात्र सहा महिने उलटूनही या बस ताफ्यात आल्या नाहीत. आता गर्दीच्या गणेशोत्सव काळात तरी ‘शिवशाही’ बस एसटीत दाखल होणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी एसटी महामंडळात बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. प्रवाशांना चांगल्या सुविधा देता याव्यात आणि जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित व्हावेत यासाठी एसटी महामंडळाने आणखी काही एसी बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला. जानेवारी २0१६च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे काही योजनांचे लोकार्पण केले. त्या वेळी शिवशाही बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. त्यानुसार ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस अशा ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या बस ताफ्यात आणण्यापूर्वी त्यांचे ‘शिवशाही’ असे नामकरणही करण्यात आले. परंतु त्यानंतर या बस ताफ्यात आणण्याच्या हालचाली थंडावल्या. एप्रिल ते जून या गर्दीच्या हंगामात शिवशाही बस दाखल झाली नाही. त्यामुळे महामंडळाला मोठा फटका बसला. आता गणेशोत्सवातही या बस आणण्यात एसटी महामंडळाला अपयश येत आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, त्यांनी शिवशाही बस अद्याप ताफ्यात दाखल झाल्या नसल्याचे मान्य केले. यासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी बैठक घेण्यात येत असून ज्या कंपन्यांकडून शिवशाही बसचे काम केले जाणार होते त्यांना बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)अद्याप करारच नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप करारच झाला नसल्याने बस ताफ्यात दाखल होण्यावरच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच कंपन्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. हे पाहता गणेशोत्सवात शिवशाही बस दाखल होणे कठीण असल्याचे सांगण्यात आले.