शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

‘शिवशाही’ पहिल्याच दिवशी फुल्ल, १८ शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 4:04 AM

आठवडाभरावर आलेले नववर्ष ‘इनकॅश’ करण्यासाठी प्रवासी वाहतूक साधनांमध्ये चढाओढ लागली आहे. यात आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील उडी घेतली आहे. महामंडळाची ड्रीम एसटी शिवशाही आता मुंबई-पणजी मार्गावर धावणार आहे. शुक्रवारपासून ही शिवशाही सुरू करण्यात आली. खासगी वाहतूकदारांकडून मुंबई-पणजी प्रवासासाठी ११०० रुपयांपासून तिकिटांची सुरुवात आहे. मात्र एसटीच्या ‘शिवशाही’चे तिकीट ९१३ रुपये आहे.

मुंबई : आठवडाभरावर आलेले नववर्ष ‘इनकॅश’ करण्यासाठी प्रवासी वाहतूक साधनांमध्ये चढाओढ लागली आहे. यात आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील उडी घेतली आहे. महामंडळाची ड्रीम एसटी शिवशाही आता मुंबई-पणजी मार्गावर धावणार आहे. शुक्रवारपासून ही शिवशाही सुरू करण्यात आली. खासगी वाहतूकदारांकडून मुंबई-पणजी प्रवासासाठी ११०० रुपयांपासून तिकिटांची सुरुवात आहे. मात्र एसटीच्या ‘शिवशाही’चे तिकीट ९१३ रुपये आहे.नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ‘ड्रीम सिटी’ म्हणून गोवा हे तरुणाईचे आवडीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे महामंडळाने अत्याधुनिक शिवशाही मुंबई-पणजी मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही शिवशाही मुंबई सेंट्रल येथून सायंकाळी ५ वाजता सुटेल. पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, म्हापसा मार्गे पणजी येथे पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. पणजी येथूनदेखील पणजी-मुंबई शिवशाही सायंकाळी ६ वाजता सुटेल. दरम्यान, पहिल्याच मुंबई-पणजी शिवशाहीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. ४५ आसनक्षमता असलेल्या शिवशाहीची ४० आसने दुपारपर्यंतच आरक्षित झाली होती.१८ शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार -महामंडळाच्या ताफ्यात २६० शिवशाही बस आहेत. यात महामंडळाच्या २१० आणि भाडेतत्त्वावरील ५० शिवशाहीचा समावेश आहे. राज्यातील ५०हून अधिक मार्गांवर शिवशाही धावत आहे. यात मुंबईसह कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नांदेड, सांगली, बोरीवली, बीड, लातूर आणि चंद्रपूर या मार्गांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लवकरच एसटीच्या शयनयान आसने असलेल्या (स्लीपर) १८ शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावतील.

टॅग्स :Shivshahiशिवशाही