मुंबई : अरबी समुद्रात आंतराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक उभारण्याचे काम लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या कंपनीकडे सोपविण्यात आले असून येत्या ३६ महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.मुंबईलगत अरबी समुद्रात असलेली शिवस्मारकासाठीची जागा राजभवनापासून १.२ किमी, गिरगांव चौपाटीपासून ३.६ किमी तर नरिमन पॉर्इंटपासून २.६ किमी समुद्रात आहे. समुद्रातील ६.८ हेल्टरच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा २१० मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार तीन निविदा राज्य सरकारकडे आल्या होत्या. त्यापैकी एल अँड टी कंपनीने ३८२६ कोटींची सर्वात कमी रकमेची निविदा सादर केली होती. शिवाय, गुणांकनामध्येही एल अँड टी या कंपनीच्या निविदेला सर्वाधिक गुण मिळाले होते, असे बांधकाम मंत्र्यांनी सांगितले.मुख्य सचिवांच्या समितीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि एल अँड टी कंपनीशी सविस्तर चर्चा केली असून या चर्चेनंतर २५०० कोटी अधिकजीएसटी इतक्या रकमेवर प्रस्ताव अंतिम करण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.>टिकेनंतर आली जागपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी भूमिपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक कुठे दिसते का, याची पाहाणी शिवप्रेमींनी शिवजंयतीदिवशी केली होती. त्यामुळे सरकारने गुरुवारी यासंदर्भात विधिमंडळात निवेदन करत कंत्राटाची माहिती दिली.
तीन वर्षांत पूर्ण होणार शिवस्मारक, एल अँड टीला कंत्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 6:19 AM