शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वीज ग्राहकांना शॉक! महावितरणाचा 15%दरवाढीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 6:53 AM

महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसूली तूट भरून काढण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे.

मुंबई : महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसूली तूट भरून काढण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर आॅगस्ट महिन्यात अमरावती, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नवी मुंबईत सुनावणी होईल. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून वाढीव वीजदर लागू होतील. महावितरणचा राज्यात नव्याने येणाऱ्या उद्योजकांना प्रतियुनिट एक रूपया सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. औद्योगिक, वाणिज्य ग्राहक व रेल्वेचा त्यात समावेश आहे. कृषीपंपासाठी ३५ टक्के दरवाढ तरप्रचंड वीज वापरणाºयांना (०.५ दशलक्ष युनिटपेक्षा जास्त) एक ते १० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचाही प्रस्ताव आहे.खर्चाची पूर्ण वसुली आणि खर्चाच्या सुसुत्रीकरणाच्या आधारावर दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याचा दावा महावितरणनेकेला आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या समितीच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाणात स्थिर खर्चाची वसुली निश्चित करण्यासाठीस्थिर/मागणी आकाराचे सुसूत्रीकरण, बिलिंग मागणीची व्याख्या सुधारणे, मुंबईतील इतर परवानाधारकांप्रमाणेचघरगुती वर्गवारीतील ग्राहकांना स्लॅबनुसार बदलता स्थिर आकार, महावितरणच्या क्षेत्रातील एसईझेड व रेल्वेच्या अनिश्चित मागणीमुळे शेड्युल पॉवर नियोजनावर होत असलेल्या परिणामाचा भार सामान्य ग्राहकांवर पडू नये म्हणून स्टॅण्डबाय व्यवस्था अनिवार्य करण्याचा समावेश असल्याचे महावितरणने म्हटले आहे.घरगुती वापरासाठी ५ टक्के३० हजार कोटींचा तोटा भरण्यासाठी भुर्दंड वीज ग्राहकांना सोसावा लागेल. महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे दरवाढीसाठी याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, घरगुती वापरासाठी १०० युनिटपुढे ५ टक्के तर रेल्वे, मोनो, मेट्रो व मॉल्ससाठी १०९ टक्के दरवाढ प्रस्तावित आहे.23%प्रत्यक्ष दरवाढ  

 - महावितरणने १५ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात तो २३ टक्के आहे.३० हजार कोटींची महसूली तूट ही पाच वर्षांतील आहे.- याचा सारासार विचार केला तरी वर्षाला हा आकडा सहा हजार कोटी आणि महिन्याला ५०० कोटी होतो. औद्योगिकदरांचा विचार करता राज्यातील वीजदर हे शेजारच्या राज्यातील वीज दरांपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी अधिक आहेत.आॅनलाइन बिल भरल्यास सवलत : घरगुती वीजग्राहकांमध्ये ० ते १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांचीसंख्या १.२० कोटी आहे. त्यांच्या दरात आठ पैसे (प्रति युनिट ४ रुपये३३ पैसे) दरवाढ प्रस्तावित आहे. बिल आॅनलाइन भरल्यास ०.५%सवलत मिळेल. २०१९-२० साठी कोणतीही दरवाढ प्रस्तावित नाही.बहुवार्षिक प्रस्ताववीजगळजी, वीजचोरी, विजेची मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीसह महसुली तूट भरून काढण्याच्यामुद्द्यावरून कायमच टीकेचे धनी बनलेल्या महावितरणने दरवाढीचा प्रस्ताव बहुवार्षिक असल्याचे म्हटले आहे.विजेची गळती १५टक्के असल्याचे महावितरण म्हणत असले, तरी प्रत्यक्षातील गळतीचे प्रमाण ३० टक्के आहे. गळती आणि चोरी कमी होत नाही किंवा महावितरणला ती कमी करता येत नाही. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत आहे. तो तोटा महावितरणला भरून काढता येत नाही.- प्रताप होगाडे,वीजतज्ज्ञक्रॉस सबसिडीचा भारकमी करण्यासाठी उच्चदाब औद्योगिक, वाणिज्य ग्राहक व रेल्वे क्षेत्रातील नवीन ग्राहकांसाठी कमी दर आणि सध्याच्या ग्राहकांसाठी वाढीव वापरावर सवलत देण्याचा विचार आहे. इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशनसाठी नवी श्रेणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnewsबातम्या