शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

धक्कादायक ! १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर २ वर्षात ११३ जणांनी केला बलात्कार

By admin | Published: April 18, 2016 11:54 AM

16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 113 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत मुलीने केलेल्या तक्रारीत बलात्कार करणा-यांमध्ये पोलिसांचादेखील समावेश असल्याची माहिती दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. १८ -  16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 113 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत मुलीने केलेल्या तक्रारीत बलात्कार करणा-यांमध्ये पोलिसांचादेखील समावेश असल्याची माहिती दिली आहे. पिडीत मुलीने आपली स्वत: सुटका करुन घेतली आणि दिल्लीला पळून गेली होती. दिल्लीमध्ये पोलीस तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दिल्ली पोलिसांनी ही केस पुणे पोलिसांकडे हस्तांतरित केली असून 113 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला अटकदेखील केली आहे. 
 
पिडीत मुलगी पश्चिम बंगालची राहणारी आहे. नोकरीचं अमिष दाखवून तिला पुण्यात आणण्यात आलं होतं. मात्र पुण्यात आणल्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. महत्वाचं म्हणजे हे प्रकरण दिल्लीमधील मॉडेल रेपप्रकरणाशी संबंधित आहे. पिडीत मुलीने जेव्हा पलायन केलं तेव्हा तिच्यासोबत ही मॉडेलदेखील होती. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी अजून 4 आरोपींना अटक केली आहे. 
 
विमानतळ पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचं नाव स्विक्रिती खरेल असून ती नेपाळची नागरिक आहे. चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रोहीत भंडारी, हरिश शाहा, तपेंद्र साही आणि रमेश ठकुला असं असून सर्वजण नेपाळचे नागरिक आहेत. हे सर्व आरोपी पुण्यातील चंदन नगरमध्ये राहायचे. तक्रारीत देण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये शक्ती, अण्णा, भारत यांचादेखील समावेश आहे. हे सेक्स रॅकेट चालवण्यात या सर्वांचा सहभाग होता. 
 
'पिडीत मुलगी नेपाळ - भारतच्या सीमारेषेवरील सिलिगुरीची रहिवासी आहे. तिचे वडील आईला सोडून गेले होते तेव्हापासून तिच्या आईची मानसिक स्थिती ढासळली आहे. तिची आजी चहाची टपरी चालवते. त्याठिकाणी आरोपी भंडारी सिगरेट खरेदी करण्यासाठी यायचा. तेव्हाच त्याने पिडीत मुलीला पाहिलं होतं. त्याने ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देतो सांगून तिला जानेवारी 2014मध्ये पुण्यात आणलं होतं. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले पण नंतर तिला वेश्याव्यवसाय करण्याची जबरदस्ती केली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि इतरांसोबत करण्यास भागही पाडलं. आरोपीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं ज्यामध्ये संजय पार्क, विमान नगर, खर्डी यांचा समावेश होता.आरोपी स्वीकृती मला हैदराबाद, अहमदाबाद आणि भोपाळला घेऊन गेली होती असा जबाब पिडीत मुलीने दिला आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
त्यानंतर पिडीत मुलीला पुण्यात आणून खर्डीमधील फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलं. याठिकाणी तिला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं. तिला मारहाणदेखील करण्यात आली. गरोदर राहिली असताना तिचा गर्भपातही करण्यात आला. तिच्यासोबत दिल्लीतील मॉडेलदेखील होती. तिलादेखील लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पडण्यात आलं होतं. सिगारेटचे चटकेदेखील देण्यात आले होते. गेल्या महिन्यात दोघी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचा बहाण्याने बाहेर पडल्या आणि दिल्लीला पलायन केलं.
 
मार्च महिन्यात जेव्हा मॉडेल उपचारासाठी दिल्लीतील रुग्णलायत भर्ती झाली होती तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना कळवल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी केस पुणे पोलिसांकडे हस्तांतरित केली होती त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. 
 
'पिडीत मुलीची वैद्यकीय चाचणी दिल्लीत करण्यात आली आहे. महानगर दंडाधिका-यांसमोर तिचा जबाबही नोंद करण्यात आला आहे. आम्ही एका आरोपीला अटक केली आहे. 22 एप्रिलपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी मिळालेली आहे. चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कोठडी मिळावी यासाठी अर्ज करणार आहोत', अशी माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी दिली आहे.