सोलापूर : लग्नानंतर अवघ्या वीस दिवसातच अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सोलापुरात घडली आहे. श्रीशैल गंगाधर म्हमाणे (रा. शेटेवस्ती, सोलापूर, मुळगाव - कोरवली ता़ मोहोळ) असे मरण पावलेल्या अभियंत्याचे नाव आहे. माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण विभागाचे संचालक गंगाधर म्हमाणे याचा तो मुलगा होता.
दरम्यान, मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने श्रीशैल यास मंगळवारी सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. किडनीला सुज येऊन मुत्राशयात जंतूसंसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू असताना बुधवारी ते मरण पावले. लग्नानंतर आकस्मिक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत श्रीशैल याचा विवाह २४ एप्रिल रोजी सोलापुरातील एका मंगल कार्यालयात झाले होते.