शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

धक्कादायक ! राज्यात मानवी तस्करीच्या होताहेत सर्वाधिक घटना; मुंबई आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 11:31 AM

जागतिक वेश्या व्यवसाय विरोधी दिन विशेष: वर्षभरात १ हजार महिलांची सुटका 

ठळक मुद्दे२०१९ मध्ये महाराष्ट्रात वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करीचे सर्वाधिक ६१४ गुन्हे दाखल

- विवेक भुसे- पुणे : वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी सर्वाधिक प्रमाणात होत असून देशभरात सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नोंदविल्या जात आहे. देशभरात होणाऱ्या मानवी तस्करीच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा वाटा १२.८ टक्के इतका आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश (१० टक्के) आणि कर्नाटक (८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रात १ हजार २० जणींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये ९४६ हून अधिक महिला, मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आले होते.सुटका करण्यात आलेल्या ९७८ महिलांपैकी ८७६ या देशाच्या विविध भागातील होत्या. तर ३१ बांगला देशी आणि ३१ इतर देशातील होत्या़ महाराष्ट्र पोलिसांनी ६५८ जणांना अटक केली होती. त्यापैकी ४०७ जणांविरुद्ध दोषारोपपत्र पाठविण्यात आले होते. परंतु, त्यापैकी केवळ एकाला शिक्षा लागली आहे. 

२०१९ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६१४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या खालोखाल आसाममध्ये १७३, मध्य प्रदेश ११८, पश्चिम बंगाल ११५, केरळ १०८, कर्नाटक ९६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.महाराष्ट्रात प्रामुख्याने नेपाळ, बांगला देश, पश्चिम बंगाल या भागातून नोकरीच्या आमिषाने तरुणींना मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. ही मानवी तस्करी रोखण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. असे असले तरी या व्यापारात गुंतलेल्यांची मोठी साखळी देशभर कार्यरत आहे. ती मोडून काढणे अजून शक्य झालेले नाही.देशातील मोठ्या शहरातील गुन्ह्यांच्या विचार करता मुंबईमध्ये सर्वाधिक ३११ मानवी तस्करीचे गुन्हे २०१९ मध्ये नोंदविण्यात आले होते. त्याखालोखाल दिल्ली (९७), बंगलुरु (८१), इंदौर (६७) पाठोपाठ पुणे (६५) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

टॅग्स :Puneपुणेsex crimeसेक्स गुन्हाProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसWomenमहिला