मुंबई : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमधील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राज्यात मुख्य लढत भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. वंचित बहुजन आघाडी आणि बसपाची उमेदवारी काही दिग्गजांच्या विजयात अडसर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे. तो कौल खरा ठरणार की अनपेक्षित निकाल लागणार, याबाबत कमालीची उत्कंठा लागून आहे.
राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, बसपा प्रमुख मायावती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आदींच्या प्रचारसभांचा झंझावात राज्याने अनुभवला. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात होणार असून आयोगाने जय्यत तयारी केली आहे. ३८ ठिकाणी मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी सुमार १ लाख कर्मचारी आणि ५० हजारहून अधिक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.
पक्षनिहाय उमेदवारकाँग्रेसने २५, राष्ट्रवादी काँग्रेस १९, भाजप २५, शिवसेना २३, वंचित बहुजन आघाडी ४७, बसप २९२०१४ मध्ये जिंकलेल्या जागाभाजप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १.