सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील बेघर वस्तीत राहणाºया मतदारांना नदी पार करून मतदानासाठी यावे लागत आहे़ लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी बेघर वस्तीत राहणाºया ग्रामस्थांनी मतदान करण्यासाठी नदीपार करून येण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मुस्ती (ता़ दक्षिण सोलापूर) हे गाव़ गावापासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर वस्ती आहे़ वस्ती व गाव यामध्ये हरणा नदी आहे़ या हरणा नदीला पूर आल्याने गाव परिसरात पाणीच पाणी झाले आहे.
आज विधानसभा मतदानापासून वस्तीबाहेर पडणाºया प्रत्येक ग्रामस्थांनी नदीपार करून मतदानासाठी यावे लागत आहे़ याबाबत जिल्हा निवडणुक शाखेला माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या संबंधित ग्रामस्थांना मदत करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत़ नदीपार करून येणाºया ग्रामस्थांना मुस्ती -दर्शनाळ - बोरेगाव- धोत्री- बोरामणी - संगदरीमार्गे मुस्ती २८ किलोमीटर पार करून मतदानाला यावे लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.