शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

दिवाळीची खरेदी शिगेला

By admin | Published: October 31, 2016 1:40 AM

दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत.

पिंपरी : दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरेदीला लोकांकडून जास्त प्रतिसाद मिळत असल्याने व्यावसायिक वर्गसुद्धा खूश असल्याचे चित्र दिसत आहे. शाळा, शासकीय कार्यालये आणि खासगी कंपन्यांना असल्याने अनेकजण सहकुटुंब खरेदीला आल्याचे दिसून येत आहे. दिवाळीसाठी नवीन कपडे, किराणा माल, फटाके, सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील कपड्यांच्या दुकानांमध्ये लहान-थोरांकडून गर्दी केली जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर फ्रिज, टीव्ही, तसेच मोबाइलसारख्या इतर अद्ययावत वस्तू खरेदीलादेखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नवीन दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या खरेदीसाठी नागरिक गाड्यांच्या शोरूमला गर्दी करू लागले आहेत. चैनीच्या वस्तूंवरील प्रस्तावित करवाढ लागू होण्याआधी नागरिकांकडून वाहन खरेदी होताना दिसत आहे. पिंपरी शहरातील बाजारपेठ सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी सोईची आहे. तसेच लोकलची सुविधा असल्याने मावळ परिसरातूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी येत आहेत. गेल्या वर्षीचा दुष्काळ यंदा पावसाने धुऊन काढला असल्याने मावळातील शेतकऱ्याची दिवाळी जोरात असल्याचे त्याच्या खरेदीवरून दिसून येत होते. शहरातील मॉलही गर्दीने तुडुंब भरले आहेत. एकाच छताखाली कपडे आणि किराणा वस्तू मिळत असल्याने बाजारातील धावपळ टाळण्यासाठी अनेकांनी मॉलमधून खरेदी करण्याला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)>देशी वस्तूंना मागणी : चिनी वस्तूंचा खप घटलाउरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटनांकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा परिणाम बाजारात पाहायला मिळाला. अनेक ग्राहकांकडून विजेच्या माळा, पणत्या, आकाशकंदील अशा चिनी बनावटीच्या वस्तू नाकारण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे दीड महिन्यापूर्वीच व्यावसायिकांनी मालाची आॅर्डर दिलेली असते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत चिनी वस्तूंचा ३० खप टक्क्यांनी घटल्याने तोटा सहन करावा लागणार, असे एका दुकानचालकाने सांगितले. याउलट बांबूपासून बनविलेले, कापडी आकाशदिवे, पणत्या अशा देशी बनावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. या वस्तूंच्या किमती चिनी बनावटीच्या वस्तूंपेक्षा जास्त असतात. मात्र लोकांकडून देशी वस्तूंना पसंती मिळत आहे. यंदा मिठाईला सर्वात जास्त मागणी असल्याचे दिसून आले. विशेष करून ड्रायफ्रूट्स आणि काजूकतली खरेदी करण्याकडे लोकांचा जास्त कल दिसून आला. खासगी कंपन्या, शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वात जास्त मिठाई खरेदी करण्यात आली. मिठाईचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मिठाईला यंदा मागणी जास्त असली तरी किंमती स्थिर असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.