अकोला, दि.२ : टिळक रोडवरील जुना कापड बाजारामधील दोन दुकाने बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून ४२ हजार रुपये किमतीचा माल लंपास केला. या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गीतानगरात राहणारे शैलेश मनोहर जांगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुना कापड बाजारात त्यांची इलेक्ट्रॉनिक्सची दुकान आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानाचे लोखंडी शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दुकानातील मोबाइलचे मेमरी कार्ड, पेन ड्राइव्हसह इतर साहित्य लंपास केले. यासोबतच आदर्श कॉलनीत राहणारे राजेश हेमनानी यांचे आदर्श ड्रेसेस नावाचे दुकानसुद्धा चोरट्यांनी फोडूून दुकानातील १0 ते १२ हजार रुपये किमतीचे रेडिमेड कपडे चोरून नेले. दोन्ही दुकानांमधून चोरट्यांनी एकूण ४२ हजार रुपयांचा माल लंपास केला. शैलेश जांगडे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कापड बाजारातील दुकाने फोडली!
By admin | Published: March 03, 2017 1:30 AM