मुंबई : मध्य प्रदेशात गोळीबार करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रांसह मालमत्ता कक्षाने गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. राज मुराद असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन देशी कट्टे व २४ काडतुसे हस्तगत केली.मालमत्ता कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एक सराईत गुन्हेगार गुरुवारी सायंकाळी ४ वाजता भायखळा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे. तपासामध्ये राज मुराद सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून दोन देशी कट्टे व २४ काडतुसे हस्तगत केली. (प्रतिनिधी)
गोळीबार करणाऱ्याला बेड्या
By admin | Published: December 24, 2016 3:54 AM