मतदार यादीतील दुबार नावे ताबडतोब वगळावीत - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 01:15 AM2019-03-17T01:15:22+5:302019-03-17T01:15:37+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत ३१ हजारांहून जास्त दुबार नावे आहेत. ती वगळावीत,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत ३१ हजारांहून जास्त दुबार नावे आहेत. ती वगळावीत,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
राज्यात आठ कोटी ४४ लाखांहून जास्त मतदार आहेत. संकेतस्थळावर दिसते. यापैकी सुमारे ४४ लाख ६१ हजारांहून जास्त नावे दुबार आहेत. या तीनही विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत पिंपरी -९४५३, चिंचवड - २२४०४ आणि भोसरी -२०६७४ अशी एकूण ५२५३१ मतदारांची दुबार नावे आहेत. अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून दुबार नावे वगळावीत, अशी मागणी केली आहे.