शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

निमित्त गणित ऐच्छिक असावे/ नसावे?... चे

By admin | Published: June 27, 2017 11:50 AM

सध्या गणित ऐच्छिक असावे की नसावे याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. तसा आमचा गणोबा सर्वांना घाबरवतोच म्हणा, पण खरं तर त्याला घाबरण्याची काहीही गरज नाही.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27- सध्या गणित ऐच्छिक असावे की नसावे याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. तसा आमचा गणोबा सर्वांना घाबरवतोच म्हणा, पण खरं तर त्याला घाबरण्याची काहीही गरज नाही. जेव्हा तो समजतो, तेव्हा तो आवडतो. म्हणूनच त्याला समजून घेणे आवश्यक आहे. 
शास्त्रांचे शास्त्र म्हणजे गणित. जीवनातील सर्व समस्या सोडविण्यासाठी गणित आवश्यक आहे. म्हणूनच ते अनिवार्य असावे, असा शिक्षणशास्त्राचा नियम. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या जीवनात पावलोपावली आवश्यक असलेल्या क्रिया आहेत. गणिताचं कमीत कमी एवढं तरी ज्ञान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. इयत्ता आठवीपर्यंत त्या चार प्रक्रियांखेरीज सरासरी, शेकडेवाडी, नफा-तोटा, सरळव्याज, चक्रवाढव्याज या जीवनोपयोगी अंकगणिताचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रत्यक्षात व्यवहारात न लागणारे बीजगणित व भूमितीही आहे. प्रश्न वाचणे, त्यावर विचार करणे, आकृती काढण्याचे कौशल्य संपादन करणे, आपण केलेला विचार तर्कसंगत पद्धतीने मांडता येण्याचा सराव मिळणे फार आवश्यक असते. या सरावामुळे आपल्या मेंदूला पुढील आयुष्यात येणाऱ्या समस्या उलगडून, त्यांचा गुंता सहज सोडविता येतो. त्यासाठी भूमिती अधिक महत्त्वाची, पण या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी पुढील गोष्टींचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. 
 
१) गणितातील प्रत्येक क्रियेचे संबोध नीट समजले पाहिजेत. 
२) प्रत्येक उदाहरणावर उलटसुलट विचार करता यायला पाहिजे. सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा करून उत्तर अचूक असल्याचा पडताळा करण्याची सवय लागली पाहिजे. सरावासाठी त्याच पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न तयार करण्याचेही कौशल्य संपादन करता यावे, एकमेकांशी चर्चा करून, खेळातूनही काही गोष्टींचा सराव करता येतो. 
३) आज ‘फास्ट फूड’चा जमाना आहे. म्हणजेच कोणतीही गोष्ट विनासायास मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. स्पर्धेचेही युग आहे. त्यामुळे शिकवणीवर्ग, मार्गदर्शिका (गाईडस्-सोल्युशन) याचा अवलंब केला जातो. त्यामुळे मुलांच्या मेंदूला आवश्यक व्यायाम मिळत नाही. जी वस्तू वापरली जात नाही ती गंजते, निरुपयोगी होते याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. आपला मेंदू म्हणजे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे. घासला तरच ब्रह्मराक्षस उभा राहतो म्हणजेच आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधणे सहज शक्य होते. आज भरपूर पैसा आहे, मुलांना देण्यासाठी वेळ मात्र नाही. त्यामुळे पालक चुकीच्या गोष्टींचा अवलंब करून कल्मशपादाप्रमाणे शापाचे उदक स्वत:च्याच पायावर पाडत आहेत; त्यांना त्याचे भान असायला हवे. 
४) विद्यार्थ्यांना खुलासेवार उदाहरणे सोडवता आली पाहिजेत. तरच त्यांच्यात एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत विचार करण्याची शक्ती निर्माण होईल. त्यात कठीण असे काही नाही. पूर्वी अशाच प्रकारे विद्यार्थी उदाहरणे सोडवू शकत. आत्ताची पिढी तर अधिक बुद्धिमान आहे. व्यवधाने अधिक आहेत हे खरे; परंतु पाण्यात पडलं की प्राणीसुद्धा स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडतो मग विद्यार्थी (मूल) तर बुद्धिमान माणूस आहे, तो कसा घाबरेल? घाबरतो आपण. ठेच लागल्याशिवाय शहाणपण येईल का? 
५) या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी इ. ८ वी पर्यंत अत्यंत उत्कृष्ट शिक्षक आवश्यक आहेत. शिक्षकांचे स्वत:चे गणितातील संबोध सुस्पष्ट असावे. त्यांना सोप्याकडून कठीणाकडे जाण्याची जाण असावी. शिक्षक उच्चविद्याविभूषित असण्यापेक्षा शिकविण्याची हातोटी आणि शिकण्याची आस असणारा असावा. विद्यार्थ्यांवर प्रेम करून त्यांना आपलेसे करणारा असावा. अभ्यासूवृत्तीचा, मेहनती असावा. मान्य की मुंबईसारख्या शहरात शिक्षकाचे घर शाळेपासून लांब असते, त्याला प्रवासाची दगदगही होते, पण तरीही आपल्या पेशाशी प्रामाणिक राहण्याची प्रबळ इच्छा त्याच्याकडे असणे आवश्यक आहे आणि इच्छा असेल तर मार्ग दिसतोच. शिक्षक क्षमाशील असावा, त्याबरोबरच स्वत:च्या चुका मान्य करून त्या सुधारण्याकडे त्याचा कल असावा. आपोआपच त्याचा हा गुण विद्यार्थ्यातही प्रतिबिंबित होईल; परंतु आज दुर्दैवाने त्याचीच उणीव आहे. त्यामुळे कच्चा पायावर इमारत उभी करणं कठीणच नव्हे, तर दुरापास्त आहे. शासन, शिक्षण खाते तसेच समाजानेही यावर केवळ विचार करणे गरजेचे नाही, तर त्यादृष्टीने ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. 
 
आता गणिताच्या निकषांची दुसरी बाजू - 
इ. ८ वी पर्यंत, गणितातील हे सारे प्राथमिक संबोध प्रत्येकाला येणे आवश्यक आहेत. भरपूर सरावाने या साऱ्या संबोधांचे दृढीकरण व्हावे हा अभ्यासक्रम शिथिल करण्यामागचा खरा हेतू आहे. हे लक्षात असू द्या. गणिती संबोध जीवनाश्यक म्हणून इ. ८ वी पर्यंत ते अनिवार्य आहेत.
मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांवर कोणतेही निर्बंध नसावे. त्याने त्याच्या आवडीनुसार शिक्षण घ्यावे. पालकांनीही त्याच्यावर कोणतीही सक्ती करू नये. त्याची आवड, कल व पात्रता याकडे चोखंदळपणे लक्ष द्यावे व त्याला योग्य मार्गाने जाण्यास मदत करावी. येथून पुढे गणितात गती असणारे, गणित आवडणारे विद्यार्थी गणिताचा अभ्यास करतीलच, पण ज्यांना त्यात विशेष प्रावीण्य नसेल त्यांनी गणित सोडून इतर विषयांचा अधिक अभ्यास करावा. संगणकीय किंवा इतर अभ्यासक्रम निवडण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नाही. एक ना धड भाराभर चिंध्या नकोतच. त्यापेक्षा तो त्याला आवडणारा कोणताही अभ्यासक्रम कोणत्याही दडपणाशिवाय मनापासून पूर्ण करू शकेल. अर्थात ज्या अभ्यासक्रमात गणिताची आवश्यकता आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा अट्टाहास त्याने किंवा त्याच्या पालकांनी करू नये. 
 
 
आणखी वाचा:
 

गणिताला पर्याय देण्यास तज्ज्ञांचा नकार

 
 
 
एस.एस.सी. बोर्डानेही गणितासाठी पर्यायी व्यवस्था केली तर निकाल लावण्याच्या निकषात त्यांची ओढाताण होणार नाही. परीक्षेचे स्टँडर्ड राखण्यातच औचित्य आहे. भाराभर गुण देऊन विद्यार्थी व पालकांची फसवणूक किंवा दिशाभूल करू नये. विद्यार्थी ज्ञानाने परिपूर्ण व्हावा, स्वत:च्या पायावर त्याच्या भविष्यासाठी त्याने उभे राहावे ही काळाची गरज आहे. याचे भान कृपया असू द्यावे. 
शासनानेही शिक्षणास सर्वाधिक महत्त्व द्यावे. नादारी व शिष्यवृत्ती यात गोंधळ करू नये. शिष्यवृत्ती ही बुद्धिमत्ता तपासणारीच असायला पाहिजे. तेथे गणिताला आणि गणिताच्या काठिन्यपातळीला कोणताही पर्याय असता नये. बुद्धिमान मुलांचे खच्चीकरण कोणत्याही प्रकारे होता नये. त्यामुळे वैयक्तिक त्या विद्यार्थ्याचेच नव्हे तर राष्ट्राचेही नुकसान होईल. 
तेव्हा गणिताचे महत्त्व कमी न होऊ देता, सामान्य विद्यार्थ्यांसाठी गणिताला ऐच्छिकतेचा पर्याय ठेवावा, जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणात अडथळा येणार नाही.
 
- विजया चौधरी
(उपमुख्याध्यापिका, बालमोहन विद्यामंदिर, दादर)